कसबा ठाणे येथील मेंढपाळाची मुलगी मधुरा हजारे बनली पुणे कारागृह पोलीस.

कसबा ठाणे येथील मेंढपाळाची मुलगी मधुरा हजारे बनली पुणे कारागृह पोलीस.

---------------------------

पन्हाळा प्रतिनिधी 

आशिष पाटील 

---------------------------

कसबा ठाणे (ता. पन्हाळा )येथील कु. मधुरा मायाप्पा हजारे ही बनली पुणे कारागृह पोलीस,बनून आपल्या वडिलांची मान उंचावली आहे, मधुरा हजारे हिचे प्राथमिक शिक्षण हे,जिल्हा परिषद,कन्या विद्या मंदिर, पुढील शिक्षण हे जय शिवराय हायस्कुल, व कॉलेज न्यू कॉलेज कोल्हापूर येथे झाले, सध्या ती B. S. C. च्या दुसऱ्या वर्षी चे शिक्षण सध्या घेतं आहे, तिने बारावी नंतर वागरे पाटील फौंडेशन येथे पोलीस भरती प्रशिक्षण साठी प्रवेश घेतला


फौंडेशन मधील प्रशिक्षक श्री.ज्ञानेश्वर वागरे पाटील व सुरेश चेचर यांच्या मार्गदर्शन मुळे आज कु. मधुरा ने आपल्या यशाला गवसणी घातली.अल्पवयातच आईच्या प्रेमाला मुकल्याने वडिलांचे व आजीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मधुराने जिद्दीने पर्यन्त केले, व ती यशस्वी झाली, ती अत्यंत साधारण घरातील बापाची व काबाड कस्ट करुन मोठं केलेल्या आजीचे व स्वर्गवाशी आईचे तसेच लहान भाऊ दीदी तू पोलीस होऊन यशस्वी हो म्हणानारा भाऊ या सर्वांचे तिने स्वप्न पूर्ण केले,मधुरा चे वडील यांनी सर्व ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार यांचे सुद्धा आभार मानले, कसबा ठाणे गावाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे त्यामुळे मधुराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.