जयसिंगपूरात बनावट दारुची विक्री अवैध बनावट दारू.
जयसिंगपूरात बनावट दारुची विक्री अवैध बनावट दारू.
----------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
पुजा नामदेव भोसले
----------------------------------
जयसिंगपूर परिसरामध्ये परमिट रूम बियर बारमध्ये बनावट दारू मिळत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. यामुळे येथील मद्यपी सांगली जिल्ह्यात जाऊन मद्यपान करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जयसिंगपूर परिसरामध्ये मद्यपान करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून कोल्हापूर जिल्ह्यातील उत्पादन शुल्क खात्याच्या दुर्लक्षामुळे या परिसरातील बारमालक ट्रेडची दारू घेण्याऐवजी बनावट दारू खरेदी करून विक्री करत असल्याचे चर्चा ऐकावयास मिळत आहे. यामुळे अनेक मद्यपी दारू बनावट असल्याने सांगली जिल्ह्यात जाऊन मद्यपान करत आहेत. याबाबत मद्यपी खुलेआम तक्रार करू शकत नाहीत, यामुळे उत्पादन शुल्क खात्याचे भावले आहे. बनावट दारू प्रकरणी सहसा कोणी तक्रार करत नसून उत्पादन शुल्क विभागाने परिसरातील परमिट रूम बियर बारमध्ये छापे टाकुन ओरिजनल दारू विक्री होत आहे काय, याची खात्री करून मोठ्या प्रमाणात म हाराष्ट्र शासनाला महसूल देत असलेल्या मद्यपीना दिलासा द्यावा, अशी मागणी मद्यपींकडून होत आहे. दरम्यान, बनावट मद्य प्राशनाने यापुर्वी अनेकांचा जीव गेला आहे. कनवाड परिसरातही अशी घटना घडल्यानंतरच उत्पादन शुल्क विभाग कारवाईचे धाडस दाखविणार आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
चौकट....
शिरोळ तालुक्यातून दारू विक्रीतून महाराष्ट्र शासन महसूल लाखो रुपयाचा फटका.परमिट रुम व बिअर बार यांना ट्रेडमधून दारू घेणे बंधनकारक असताना देखील वाईन शॉप कडून खरेदी
चौकट...
वाईन शॉप चा मद्य जर बार मध्ये आढळून आल्यास तर पन्नास हजार रुपयाचा दंड देखील आहे दुय्यम निरीक्षकांना माहिती असून देखील वर्षीतून कव्यचित कार्यवाही केली जाते कारण त्यांना वरच मलई ठरवलं आहे .जयसिंगपूर व कुरुंदवाड साठी दोन दुय्यम निरीक्षक आहेत
Comments
Post a Comment