ग्रामपंचायत मधील दुकान गाळ्यांचे भाडे का मागीतले म्हणून विद्यमान सदस्याने केली लिपिकास मारहाण.कोलव ग्रामपंचायत मधील प्रकार .

 ग्रामपंचायत मधील दुकान गाळ्यांचे भाडे का मागीतले म्हणून विद्यमान सदस्याने केली लिपिकास मारहाण.कोलव ग्रामपंचायत मधील प्रकार .

-------------------------------

राधानगरी प्रतिनिधी.

विजय बकरे.

-------------------------------

राधानगरी.कौलव ग्रामपंचायतीच्या दुकान गाळ्यांचे भाडे का मागितलेस या कारणावरून ग्रामपंचायतचे माजी डेप्युटी सरपंच विद्यमान सदस्य अजित पाटील यांनी लिपिक सागर पाटील यास मारहाण केली .या घटनेची सीसीटीव्ही फुटेज मध्ये नोंद झाले असून सागर पाटील याने राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये अजित पाटील यांच्या विरोधात फिर्यादी दिली आहे. 

      पोलिसांकडून  मिळालेल्या माहितीनुसार अजित पाटील यांच्याकडे ग्रामपंचायतच्या एक गाळा आहे. तो गाळा त्याने एका संस्थेस भाड्याने दिला आहे. त्याचे भाडे मागण्यासाठी ग्रामपंचायत लिपिक सागर पाटील हे गेले होते. या गाळाचे भाडे न मिळाल्याने त्याने अजित पाटील यास सांगितले . अजित पाटील यांनी संस्थेकडून  भाडे घे तुम्ही पावती  घेतली आहे त्यामुळे भाडे तुम्हीच द्या संस्थेला भाडे देण्यास सांगा.यावरून दोघांमध्ये बाचाबाची भाडे का मागितलेस यावरून अजित पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सागर पाटील यास मारहाण केली.तू उद्या पासून कामावर येऊ नकोस असे अजित पाटील यांनी त्याला सांगीतले.त्याची फिर्याद सागर पाटील यांनी राधानगरी पोलिसांना दिली.सदर घटनेची चौकशी राधानगरी पोलिस  कॉन्स्टेबल श्री खामकर व सुर्यवंशी करत आहेत.

07:25


Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.