हिंगणगाव येथे चोरी एक लाखापेक्षा जास्त रुपयाचा मुद्देमाल लंपास.
हिंगणगाव येथे चोरी एक लाखापेक्षा जास्त रुपयाचा मुद्देमाल लंपास.
--------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
--------------------------
हिंगणगाव तालुका हातकलंगले येथील हिंगणगाव कवठेसार रोडवर असणाऱ्या प्रवीण सुधाकर पाटील यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्याने घरात कोण नसल्याची पाहून घरात चोरी केली ,त्यामध्ये साधारणता 51 हजार रुपये पाऊण तोळे सोने चोरून नेले असल्याची माहिती प्रवीण सुधाकर पाटील यांनी पोलिसांना दिले आहे .
.दोन दिवसापूर्वी प्रवीण सुधाकर पाटील व त्यांच्या घरची मंडळी काही कामानिमित्त गारगोटी येथे गेले होते घरात कोण नसल्याचे पाहून चोरट्याने घराचा कुलूप कोंयडा तोडून घरामध्ये प्रवेश केला व तिजोरी मध्ये असलेले पैसे व सोने लंपास केले .सदर घटनेची नोंद हातकणंगले पोलीस स्टेशन येथे प्रवीण सुधाकर पाटील यांनी केली असून सदर चोरीच्या घटनास्थळी श्वान पथक ठशे तज्ञाना पाचारण करण्यात आले होते .परंतु काही अंतरावर श्वान घोटमळले असल्याने सदर चोरीचा तपास लागू शकला नाही. परिणामी परिसरात होणाऱ्या वारंवार चोरीचा तपास हातकणंगले पोलिसांनी तात्काळ लावावा अशी मागणी हिंगणगाव परिसरातील नागरिकांच्यातून होत आहे. सदर घटनास्थळी तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष संजय देसाई, सरपंच दीपक पाटील ,माजी सरपंच महावीर पाटील पोलीस पाटील , महावीर देसाई प्रवीण मुजावर हाकलंगले पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment