नामदार चषकाचा मानकरी कौतुक डाफळे पै. आनंदा मांगले युवा चषकाचा. मानकरी नरसिंह पाटील.
नामदार चषकाचा मानकरी कौतुक डाफळे पै. आनंदा मांगले युवा चषकाचा. मानकरी नरसिंह पाटील.
-------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-------------------------------
मुरगूड येथील नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत खुल्या गटामधे अंतीम लढतीत पिंपळगावच्या कौतुक डाफळे याने आमशीचा आंतरराट्रीय मल्ल सुशांत तांबोळकर याला सात विरुद्ध दोन गुण फरकांनी पराभूत करून अडीच लाखाचे बक्षीस मिळवले. तर ५७ किलो वजनी गटात पै. आनंदा मांगले युवा चषकाचा मानकरी म्हारुळचा नरसिंह पाटील ठरला तर पै. शेखर म्हामुलकर कुमार चषकाचा मानकरी ठरला.
सुरवातीपासूनच कौतुक डाफळे आक्रमक होत खेळत होता. पण थोड्या वेळ्याने कौतुक शांत झाल्याचे पाहून सुशांत आक्रमक झाला व दुदेरी पट काढला. व त्याने लगेच मोळी डावाची पकड करून दोन गुणांची नोंद केली. यावेळी कौतुकने सावध पवित्रा घेत सात गुणांची आघाडी घेत नामदार चषकासह आडीच लाखाचे बक्षीस व गदा मिळवली.
या कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ वैद्यकीय शिक्षणमंत्री नाम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तर यावेळी बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील, गोकुळ दुध संघाचे चेअरमन अरूण डोंगळे, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, गोकुळचे संचालक युवराज पाटील, बिद्रीचे संचालक सुनिलराज सुर्यवंशी, रंगराव पाटील, मनोज फराकटे, भुषण पाटील, रणजीत मुडूकशिवाले, रणजीत सुर्यवंशी, रावसाहेब खिलारी, डॉ सुनिल चौगले, आरटीओ प्रिया सुर्यवंशी, उमेश भोईटे, उमेश लोकरे, विकास पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी नाम. हसन मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले. समालोचन बट्टू जाधव यांनी केले.
विविध वजनी गटाचा निकाल पुढील प्रमाणे...
1. 22 किलो
1.वरद पाटील सरवडे
2.श्रीविनायक चव्हाण शिंदेवाडी
3.वीर चव्हाण दिंडनेर्ली
4.गौरव मोरबाळे मुरगूड
2. 25 किलो
1. विश्वजित शिनगारे तलंदगे
2.आदर्श सुतार निगवे
3.समर्थ कांबळे मुरगूड
4.आर्यन दिवटे मुरगूड
3. 30 किलो
1युवराज कामण्णा तळसंदे
2श्रेयस दिवटे शिंदेवाडी
3 विराज पाटील वाघुर्डे
4 अभिमन्यू पाटील केनवडे
4. 35 किलो
1.रोहन शियेकर कूशिरे
2.प्रतीक पाटील घानवडे
3. श्रेयस पुजारी तळसंदे
4. शिवरुद्र चौगले
5. 42 किलो
1. शिवानंद मगदूम सिद्धनेर्ली
2. स्वराज्य कदम पाचगाव
3. आदित्य संभाजी मगदूम भामटे
4. रविराज पाटील बानगे
6. 46 किलो
(कुमार चषक मानाची गदा)
1.शेखर म्हामुलकर शाहूवाडी
2. राजवर्धन पाटील पाचगाव
3. शिवाजी लिंगाप्पा शिरोळे पट्टणकोडोली
4. हर्षवर्धन शिंगे केनवडे
7. 52 किलो
1.प्रवीण घारे तिटवे
2.प्रतीक पाटील पाचगाव
3. श्रीकांत सावंत भोसे
4. समर्थ माळी हुपरी
8. 57 किलो
आनंदा मांगले युवा चषक
1.नरसिंह पाटील म्हारूळ
2.प्रवीण वडगावकर शेंडुर
शाहू साखर
3.धनराज जमनिक बानगे
4.संकेत पाटील पाडळी
9.. 60 किलो
1. मृणाल पाटील बेले
2 अतुल चेचर पोर्ले
3. तेजस पाटील कोडोली
4. सारंग पाटील पाडळी
10.65 किलो
1. कर्णसिंह माने राशिवडे
2.आर्यन पाटील राशिवडे
3. सुशांत पाटील म्हाकवे
4. कौतुक शिंदे मुरगुड
11. 74 किलो
1.सौरभ पाटील राशिवडे
2.आकाश कापडे आनुर
3. साताप्पा हिरुगडे बानगे
4.निलेश हिरूगडे बानगे
12. खुला गट
1. कौतुक डाफळे पिंपळगाव
2. सुशांत तांबोळकर आमशी
3.शशिकांत बोंगार्डे बा न गे
4.मुंतजित सरनोबत पुणे
Comments
Post a Comment