कुंभोज आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालय होणे बाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन.
कुंभोज आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालय होणे बाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन.
------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------
कुंभोज तालुका हातकलंगले येथे छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जवळजवळ तीन कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले कुंभोज आरोग्य केंद्र सध्या अनेक सेवा सुविधामुळे वंचित असून सदर ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या सह दवाखान्यात आवश्यक असणारी साधनसामग्री मशनरी नाही उपलब्ध नसल्याने सदर आरोग्य केंद्राकडे नागरिकांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसत असून तीन कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीत आवश्यक असणारी साधनसामग्री व यंत्रणा उपलब्ध करणे ही शासनाची जबाबदारी आहे परिणामी दवाखान्याचे उद्घाटन होऊन सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी अद्यापही दवाखान्यात कोणत्याही पद्धतीचे मशिनरी व साधनसामुग्री आहे हे व दवाखान्यासाठी आवश्यक असणारे आरोग्य कर्मचारी उपलब्ध न झाल्याने सदर दवाखान्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली असून सदर दवाखान्याचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर झाल्यास दवाखान्यात आवश्यक असणारी साधनसामग्री मशनरी शासनाच्या वतीने पुरविण्यात येतील व त्याचा लाभ कुंभोसह परिसरातील पाच ते सात गावांना होईल असे निवेदन कुंभोज राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष व संजय गांधी निराधार कमिटीचे संचालक संदेश भोसले , विश्वजीत माने,सुशांत कोल्हे, विनोद शिंगे,उद्यय भोसले, यांच्या वतीने देण्यात आले.
सदर निवेदनात नामदार हसन मुश्रीफ शिफारस व कुंभोज ग्रामपंचायतचे ग्रामसभा ठराव जोडला आहे.कुंभोज ग्रामीण रुग्णालय झाले तर आसपासच्या परिसरातील गावांना फायदा होईल असे संदेश भोसले म्हणाले.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment