सोन्यासाठी विवाहितेचा छळ पतीसह तिघांवर गुन्हा दाखल.
सोन्यासाठी विवाहितेचा छळ पतीसह तिघांवर गुन्हा दाखल.
------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
------------------------------
गांधीनगर:- माहेरून सोने खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपये घेऊन ये तसेच चारित्र्याचा संशय घेत शिवीगाळ करून मारहाण करत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याबद्दल पतीसह सासू सासरे आणि दिर अशा तिघांविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद पीडित नकुशा उर्फ सौरभ दावणे (वय 24,रा. सध्या वसगडे ता करवीर, मूळ राहणार कागल जि. कोल्हापूर यांनी दिली. याप्रकरणी पती सौरभ सुरेश दावणे, दिर सचिन सुरेश दावणे,
सासरे सुरेश दावणे, सासू राजेश्री सुरेश दावणे अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी पीडित महिलेचे सप्टेंबर 2019 रोजी कागल येथे सौरव दावणे यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर काही दिवसांनी मला वरचेवर माहेरून सोने घेण्यासाठी 50 हजार रुपये घेऊन ये नाहीतर तुला अशीच वागणूक देऊ अशी दमदाटी करत पतीने वारंवार मारहाण केली. तसेच सासू-सासरे आणि दिर यांनी शिवीगाळ करत माझ्या चारित्र्यावर संशय घेत तू चरित्रहीन आहेस असे म्हणत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. त्यानंतर आम्ही दोघे पती-पत्नी भाड्याच्या घरामध्ये राहू लागलो. तिथेही सासू-सासर्यांनी येऊन मानसिक छळ केला . त्या रागाच्या भरात मी 1 मे रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण मला माझ्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल करून माझा जीव वाचवला. याची नोंद ही गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. या कारणावरून पतीसह तिघांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गांधीनगर पोलीस करीत आहेत.
Comments
Post a Comment