कुंभोज गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार.
कुंभोज गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार.
---------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------
सत्कार हा कर्तुत्वाचा होत असतो सत्कार हा सतकार्याचा होत असतो परिणामी कुंभोज गावच्या शिरपेच्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त करून काही मान्यवर मंडळीनी मानाचा तुरा रोवला आहे. अशा सर्व मंडळींचे कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या इथून पुढील कार्यास कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो असे गौरव उद्गार कुंभोज ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुनील वाडकर यांनी काढले.
ते कुंभोज तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने आयोजित वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. यावेळी कुंभोज गावच्या नूतन सरपंच पदी निवड झाल्याबद्दल जयश्री महापुरे तसेच श्रमशक्ती फाउंडेशन इचलकरंजी यांचा आदर्श सरपंच पुरस्कार जयश्री जाधव ,युवा उद्योजक पुरस्कार अनिकेत चौगुले, आदर्श पत्रकार राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार पत्रकार विनोद शिंगे व आदर्श समाजसेवक समाजरत्न पुरस्कार आप्पासाहेब पाटील यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार कुंभोज ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कुबेर हराळे धनाजी तिवडे, नंदकुमार माळी तुषार कोळी सुनील वाडकर, सचिन कोळी, अरुण माळी, नंदकुमार माळी मुनीर सुतार, सुभाष पाटील आणि मोघे, आधी माजी ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने करण्यात आला यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक माजी सरपंच सुनील वाडकर व आभार ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब पाटील यांनी मांनले.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment