अवघ्या काही मिनिटात नरसिंह वाडी पोलिसांनी लावला तीन वर्षाच्या मुलीचा शोध.
अवघ्या काही मिनिटात नरसिंह वाडी पोलिसांनी लावला तीन वर्षाच्या मुलीचा शोध.
-------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
-------------------------------
कोल्हापूर. मुंबईमधील प्रकाश मनोहर मांजरेकर वय वर्ष 45 धंदा शिक्षक हे आपल्या कुटुंबासह नरसिंह वाडी येथे देवदर्शनाकरिता आले होते दुपारच्या सुमारास देवदर्शन आटोपून आपली मुलगी नुविक प्रकाश मांजरेकर वय वर्ष तीन हिला नृरसिंह वाडी येथे विसरून चार चाकी वाहनातून खिद्रापूर येथे गणपती मंदिरात दर्शनाकरता गेले होते त्यांना त्यांची मुलगी कुठेच दिसून आली नाही त्यामुळे तिचा आसपासच्या परिसरात शोधाशोध केली नंतर त्यांच्या लक्षात आले मुलगी नुविका नृसिंहवाडी मंदिराच्या परिसरात हरवली आहे त्यांनी तात्काळ शिरोळ पोलीस ठाण्याची संपर्क साधून मुलगी हरवल्याचे कळवले शिरोळ पोलिसांना कळवले पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी शिरोळ पोलीस ठाणे अंकित नृसिंहवाडी पोलिसांना तात्काळ सूचना देऊन या मुलीचा शोध घेण्यास सांगितले असता पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबा पटेल ,पोलीस कॉन्स्टेबल हक्के, पोलीस कॉन्स्टेबल खराडे व पोलीस मित्र शरद दिलीप सुतार यांनी नरसिंहवाडी मंदिरामध्ये शोधाशोध केले असता सदरची मुलगी नुविका प्रकाश मांजरेकर वय वर्षे तीन हि मंदिराच्या परिसरात फिरताना आढळून आली तिला ताब्यात घेऊन पोलिसांनी तिच्या पालकांशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात दिली पोलिसांनी दाखवलेल्या तत्पर भूमिकेमुळे तीन वर्षाची मुलगी अवघ्या काही मिनिटातच पोलिसांना मिळाली त्यामुळे जनमानसात पोलिसांची मान उंचावली आहे
Comments
Post a Comment