शुभम सिदनाळे , सुशांत तांबोळकर कौतुक डाफळे ,मुंतजीत सरनोबत नामदार चषकासाठी दावेदार.

 शुभम सिदनाळे , सुशांत तांबोळकर कौतुक डाफळे ,मुंतजीत सरनोबत नामदार चषकासाठी दावेदार.

-------------------------------

 मुरगूड प्रतिनिधी 

जोतीराम कुंभार

-------------------------------

         मुरगूड येथे नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत खुल्या गटातील शुभम सिदनाळे , कौतुक डाफळे , मुंतजीत सरनोबत यांची नामदार चषकासाठी दावेदारी असणार आहे .

        मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेती नंदिनी साळोखे ( मुरगूड ), सृष्टी भोसले ( पिराचीवाडी ) ,BISF मध्ये निवड झालेले संकेत चौगले ( मुरगूड ) यांचा सत्कार करण्यात आला . 

            यावेळी 57 किलो गट पुढच्या फेरीत प्रवेश केलेले मल्ल : संकेत पाटील ,शुभम रानगे ,

हर्षवर्धन जाधव ,प्रवीण वडगावकर ,धनराज जमनीक , ओंकार कुंभार ,नरसिंह पाटील ,४२ किलो वजन गट : रविराज पाटील , संस्कार माने , शिवानंद मगदूम ,शुभम (बानगे), स्वराज्य कदम ,ओमकार गोबुगडे ,आदित्य मगदूम 

             कुस्ती बक्षीस समारंभा दिवशी मंत्री मुश्रीफ यांचा वाढदिवसानिमित्त शहर राष्ट्रवादीच्या वतीने चांदीची गदा देवून साजरा करण्यात येणार आहे . स्पर्धेत पंच म्हणून संदीप पाटील, बाबा शिरगावकर , आनंदा गोडसे , आकाश नलवडे , वैभव तेली , महेश पाटील , पांडूरंग पुजारी व निवेदक म्हणून राजाराम चौगले यांनी काम पाहिले. स्वागत युवराज सूर्यवंशी प्रस्ताविक रणजित सूर्यवंशी तर

आभार डॉक्टर सुनिल चौगले यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.