पुलाची शिरोली येथे हद्दवाढीविरोधात पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन.
पुलाची शिरोली येथे हद्दवाढीविरोधात पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन.
लोकप्रतिनधींची भूमिका असपष्ट
-------------------------------------------------
अमीत खांडेकर
-----------------------------------------------
कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर असताना हद्दवाढीविरोधात व समर्थनात वातावरण तापलेले आहे. मागील आठवड्यात न्यू पॅलेस येथे खासदार शाहू महाराज यांच्या सह कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार खासदार यांची बैठक झाली होती.त्यावेळी सर्वानुमते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हद्दवाढीच्या बाजूने सर्वानुमते निर्णय घेण्याचे ठरले होते. आज मुंबई येथे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची बैठक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत होत आहे.या बैठकीत काय हद्दवाढीसंदर्भात काय निर्णय होतो,याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जबरदस्तीने हद्दवाढ लादू देणारा असा पवित्रा या १७ गावातील गावकऱ्यांनी घेतला आहे.या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर वर १७ गावामध्ये हद्दवाढीविरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
पुलाची शिरोली येथे व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच स्वयंस्फूर्तीने आपले व्यवहार बंद ठेवून हद्दवाढीला विरोध दर्शविला आहे.
गावांतील तरुण पिढीने पुढाकार घेऊन आक्रमक होऊन आज अनोखे आंदोलन केले.पुलाची शिरोली येथे पुणे बेंगलोर महामार्गांलगत असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल सुमारे तासभर आंदोलन केले.
शिरोली आमच्या हक्काची-नाही कुणाच्या बापाची, हद्दवाढ रद्द झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
आजच्या गावबंद मध्ये गावातील राजकीय पुढाऱ्यांनी पाठ फिरवल्याने या लोकप्रतिनिधींना हद्दवाढ हवी आहे काय? हद्दवाढीला समर्थन आहे असे समजायचे का ?असा संतप्त सवाल तरुणांनी उपस्थित केला.
तसेच ग्रामपंचायत चौकात सत्ताधारी गटाचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुका प्रमुख व विद्यमान उपसरपंच बाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हद्दवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले.यावेळी पेठवडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील,भाजपचे राजेश पाटील, सतिश पाटील,माजी उपसरपंच कृष्णात करपे, प्रकाश कौंदाडे, बाळासाहेब पाटील, योगेश खवरे, दिपक यादव,संपत संकपाळ, बटील देसाई,सागर कौंदाडे,सागर मोरे आदी सहभागी झाले होते
आज गाव बंद दरम्यान पाण्याच्या टाकीवर चढून अनोखे आंदोलन अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता केल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. या आंदोलनाची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली व आंदोलन कर्त्याणा ताब्यात घेतले.
Comments
Post a Comment