श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल.

अमर इंदलकर सातारा .
--------------------------------------------------
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. २६/०६/२०२५ ते दि.३०/०६/२०२५ अखेर सातारा जिल्हयातून मार्गक्रमण करणार असून सदर पालखी सोहळा पुणे जिल्हयातुन सातारा जिल्हयात दि. २६/०६/२०२५ रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद, तरडगांव, फलटण, वरड या ठिकाणी मुक्काम करुन दि.३०/०६/२०२५ रोजी सोलापूर जिल्हयात जाणार आहे. सदरचा पालखी सोहळा हा निरा लोणंद फलटण मार्गे पंढरपुर रस्त्याने जाणार असलेने तसेच पालखी सोहळयात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने पालखी जाणारे मार्गावर कोणताही अपघात घडु नये, वाहतुक समस्या निर्माण होवू नये तसेच अनुचीत प्रकार घडू नये याकरीता पोलीस अधीक्षक सातारा महाराष्ट्र यांनी पालखी सोहळयातील वाहनांखेरीज व अत्यावश्यक सेवेतील (पोलीस रुग्णवाहीका, अग्निशामक वाहने) खेरीज करून इतर सर्व वाहनांना निरा लोणंद पंढरपूर मार्गावर दि. २५/०६/२०२५ ते दि.३०/०६/२०२५ या कालावधीत खाली नमुद केल्याप्रमाणे प्रवेश करण्यास मनाई केलेली आहे.
१) दि. २५/०६/२०२५ रोजीचे ०६.०० ते दि. २९/०६/२०२५ रोजीचे २४.०० वा. पर्यंत फलटण येथून पुणे, निरा, लोणंदकडे जाणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पूणेकडे शिरगांव घाटातून वळविणेत येत आहे.
२) दि. २५/०६/२०२५ रोजीचे ०६.०० वा. पासून ते दि. २८/०६/२०२५ रोजी २४.०० वा. पर्यंत आदकी फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणारे वाहनाखेरीज इतर वाहनांना बंद करणेत येत आहे.
३) दि. २५/०६/ २०२५ रोजीचे ०९.०० पासून ते दि.३०/०६/२०२५ रोजीचे १३.०० वा. पर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदकी मार्ग फलटणकडे वळविण्यात येत आहे.
४) दिनांक २५/०६/ २०२५ रोजीचे ००.०० वा. ते दिनांक २९/०६/२०२५ रोजीचे २४.०० वा. पर्यंत फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.
५) दि. २८/०६/२०२५ रोजीचे ००,०० पासून ते दि. ३०/०६/२०२५ रोजीचे १६.०० वा. पर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.
६) दि. २८/०६/२०२५ रोजीचे ००.०० पासून ते दि. ३०/०६/२०२५ रोजीचे २४.०० वा. पर्यंत नातेपुते कडुन पुणे बाजुकडे जाणारी वाहतुक माळशिरस अकलुज येथून बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.
७) दि. २८/०६/२०२५ रोजीचे ००.०० पासून ते दि. ३०/०६/२०२५ रोजीचे १६.०० वा. नातेपुते कडून फलटण मार्ग साताराकडे जाणारी वाहतुक शिंगणापुर तिकाटणे मार्ग दहीवडी सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुते कडुन पुण्याकडे जाणारी वाहतुक नातेपुते दहीगाव- जांब - बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.
८) दि. २८/०६/२०२५ रोजीचे ००.०० पासून ते दि.३०/०६/२०२५ रोजीचे १४.०० वा. पर्यंत नातेपुते - वाईवाठारकडे जाणारी वाहतुक शिंगणापुर तिकाटणे-शिंगणापुर गावली-कोळकी झिरपवाडी- विदुणी ढवळपाटीवाठार फाटा मागे वळविण्यात येत आहे.
९) दिनांक २९/०६/ २०२५ रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड मुक्कामी सकाळी ०६.०० वा. मार्गस्थ होणार आहे. सदर वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपुर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण दहीवडी चौक कोळकी शिंगणापूर तिकाटणे वडले पिंप्रद बरड अशी वळविण्यात येत आहे.
पालखी सोहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळयातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी मार्गाने ये-जा करतील याची इतर वाहनधारकांनी नोंद घ्यावी.
Comments
Post a Comment