दिव्यांगांच्या सर्वागीण व्यक्तिमत्व विकासाचे रोजगारभिमुख प्रवेश व्दार खुलं : मॅक अध्यक्ष मोहन कुशीरे मोफत प्रशिक्षणातून दिव्यांग्यांना रोजगार देणार
दिव्यांगांच्या सर्वागीण व्यक्तिमत्व विकासाचे रोजगारभिमुख प्रवेश व्दार खुलं : मॅक अध्यक्ष मोहन कुशीरे मोफत प्रशिक्षणातून दिव्यांग्यांना रोजगार देणार .

------------------------------------------------------------
शशिकांत कुंभार
---------------------------------------------------------
दिव्यांगांच्या सर्वागीण व्यक्तिमत्व विकासाचे रोजगारभिमुख प्रवेश व्दार खुलं झालं असून व्यक्तिमत्वाला साजेसे सहज पेलता येईल असे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मॅक असोसिएशन सर्वोतोपरी सहकार्य करेल असे प्रतिपादन मॅक अध्यक्ष मोहन कुशीरे यांनी केले.
असोसिएशन पर्सन विथ डिसअबिलिटी बेंगलोर, महिला कल्याण संस्था, बेळगाव, युवा ग्रामीण विकास संस्था, गारगोटी, हेल्पर्स ऑफ हंडीकॅप्ड , कोल्हापूर यांच्या संयुक्त सहयोगाने
दिव्यांग युवक - युवती साठी मोफत ३० दिवसाच्या रोजगार विषयक कौशल्ये प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी हेल्पर्स संस्थेचे अध्यक्ष अभिजित गारे होते.
यावेळी महिल कल्याण संस्थेच्या वैजयंती चौगुला म्हणाल्या की, सामाजिक क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान प्रेरणादायी राहिले आहे. दिव्यांग युवक- युवती यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण बरोबर रोजगार देण्याचे काम केले जाणार आहे.
यावेळी हेल्पर्स संस्थेचे अध्यक्ष अभिजित गारे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग युवक- युवतीना कौशल्ये प्रशिक्षण व शैक्षणिक दुष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्था नेहमीच मार्गदर्शक राहिली आहे.
कार्यक्रमास महिला कल्याण संस्थेच्या सचिव वैजयंती चौगुला, युवा संस्थेचे स्थलांतरित कामगार लक्ष्यगट हस्तक्षेप प्रकल्पांचे व्यवस्थापक मोहन सातपुते, मॅकचे सेक्रेटरी शंतन्यू गायकवाड, विश्वस्त मनोहर देशभ्रतार, सुजाता गारे, जयश्री गोखले, तानाजी देसाई,सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पाटील , किरण चौगुला, छाया देसाई , प्रशिक्षक प्रज्ञा मगर, विराज स्वामी यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले.आभार शिवाजी पाटील यांनी मानले.स्वागत निखिल बनसोडे यांनी केले.
फोटो ओळ: एपीडी, महिला कल्याण संस्था, युवा ग्रामीण विकास संस्था, हेल्पर्स ऑफ हंडीकॅप्ड यांच्या संयुक्त सहयोगाने दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन प्रसंगी मॅक अध्यक्ष मोहन कुशीरे, मोहन सातपुते,हेल्पर्स अध्यक्ष अभिजित गारे,
सेक्रेटरी शंतन्यू गायकवाड , अन्य मान्यवर
Comments
Post a Comment