डिजिटल मीडियाला राजमान्यता : उद्या (गुरुवारी) कोल्हापुरात आनंदोत्सव सोहळा
डिजिटल मीडियाला राजमान्यता : उद्या (गुरुवारी) कोल्हापुरात आनंदोत्सव सोहळा
(यशस्वी लढ्याबद्दल श्रीयुत राजा मानेसाहेब यांच्या सत्काराचे 13 जूनला आयोजन)
------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
शशिकांत कुंभार
-----------------------------------------------
महाराष्ट्र शासनाने डिजिटल मीडियामधील चॅनल्स व वेब पोर्टल्सना राजमान्यता देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. साहजिकच यामुळे शासनाच्या जाहिराती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचे परिपत्रक दिनांक 3 जून रोजी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व वरिष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील लढ्याला यश आले असून राज्यभरातील डिजिटल मीडियामधील संपादक, पत्रकारांना याचा लाभ होणार आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असून देशभरातील 12 हजारांहून अधिक डिजिटल मीडियामधील संपादक, पत्रकार या संघटनेचे सभासद आहेत. सन 2019 पासून शासन दरबारी सुरु असलेला लढा यशस्वी झाल्याबद्दल तसेच महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करण्यासाठी साखर-पेढे वाटपाचा कार्यक्रम उद्या (गुरुवारी) आयोजित करण्यात आला आहे.
महत्वाची टीप : आज बुधवारी होणारा आनंदसोहळा काही तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि गुरुवारी सायंकाळी होणाऱ्या सोहळ्यास संघटनेच्या कोल्हापूर शहर, जिल्हा व तालुका पातळीवरील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आवर्जून उपस्थित रहावे .
स्थळ : छत्रपती शाहू महाराज पुतळा, दसरा चौक, कोल्हापूर
गुरुवार, दि. 5 जून 2025
वेळ : सायं. 5.00 वाजता.
( कार्यक्रम वेळेत सुरू होईल )
मा. सुहास पाटील
उपाध्यक्ष : पश्चिम महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना.
श्री.भाऊसाहेब फासके
कोल्हापूर जिल्ह्याध्यक्ष
डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना.
मा. अझरुद्दीन मुल्ला
कोल्हापूर शहर अध्यक्ष - डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना.
Comments
Post a Comment