भाजपा महायुतीच्या मागणीला यश.
------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशीकांत कुंभार
------------------------------
*काही दिवसांपूर्वी भाजपा महायुतीच्या वतीने वडगांव शहरातील वाहतूक कोंडी विरोधात वडगांव पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन विरोधात एल्गार पुकारात वाहतूक कोंडीचा त्रास संपविणे साठी व एकेरी वाहतुकीचे नियोजन करावे मागणी साठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.यावेळी आपले लाडके लोकनेते आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू )यांनी तात्काळ पोलीस प्रशासन व वडगांव पालिका प्रशासन भाजपा पदाधिकारी बरोबर एकत्रित बैठक घेऊन रिंगरोड चा प्रश्न तात्काळ संपविण्याचे व वाहतूक कोंडी संपविण्याचे आश्वासन दिले होते.त्या आश्वासन नुसार बापूंनी आधीकार्याच्या कडे पाठपुरावा सुरू केला होता,आज स्वतः बापूंनी सार्वजनिक बांधकाम विभाग व वडगाव पालिका प्रशासन अधिकारी यांना घेऊन आमदार साहेबांनी रिंगरोड पाहणी केला तसेच तात्काळ रास्ता करणेसाठी प्रस्ताव तयार करनेचे आदेश दिले आहेत यामुळे लवकरच वडगांव शहराला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी चा प्रश्न हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू ) यांच्या प्रयत्नातून निकालात निघणार आहे भाजपा च्या मागणीची दखल घेत बापूंनी रिंगरोड चा प्रश्न निकाली काढणेचा व वडगाव शहरवासीयांना वाहतूक कोंडी च्या त्रासातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेचे दिसून येत आहे. या सर्वेक्षण वेळी मुख्याधिकारी मा.सुमित जाधव,pwd अधिकारी राजेश ठाकूर,वरिष्ठ अधिकारी,लोकनियुक्त नगराध्यक्ष मा.मोहनलाल माळी, मा.रंगराव बावडेकर, भाजपा वडगांव मंडल अध्यक्ष मा.अमरसिंह पाटील,भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मा.तय्यब कुरेशी,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मा.आप्पा माने , डॉ.अशोक चौगुले, मा.सलीम मुलाणी,मा.राजकुमार मिठारी,मा.रघुनाथ पिसे,मा.दिनेश सनगर,बांधकाम अभियंता मा.ओंकार महाडिक,नगर रचना अधिकारी ललिता सुतार व अन्य अधिकारी उपस्थित होते*
Comments
Post a Comment