Posts

Showing posts from September, 2025

2/9/2025 रोजी राज्यस्तरीय ज्युनिअर अथलेटिक्स भैरवनाथ स्पोर्ट्स अनुकुमारी कुशवाह हिचा 500मिटर चालणे 3 क्रमांक.

Image
  2/9/2025 रोजी  राज्यस्तरीय ज्युनिअर अथलेटिक्स भैरवनाथ स्पोर्ट्स अनुकुमारी कुशवाह हिचा 500मिटर चालणे 3 क्रमांक. --------------------------------------  मिरज तालुका प्रतिनिधी  राजु कदम --------------------------------------  पुणे .शिवजीमहाराज क्रिड़ा संकुल बालेवाडी येथे झालेल्या राज्य स्तरीय जुनियर अथलेटिक्स स्पर्धेमध्ये बामणोच्या श्री भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन ची कुमारी अनुकुमारी धर्मेंद्रसिंह कुशवाह हिचा 5000 मीटर चालणे या क्रीडा प्रकारात (कांस्य पदक)महाराष्ट्रात तीसरा क्रमांक मिळाल्याबद्दल तिचे बामणोली गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री किरण भोसले यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला "सलाम तुझ्या जिद्दीला "                                                   दीड वर्षापूर्वी तिचे अपघात झाले होते त्या अपघातामध्ये तिच्या दोन्ही पायाला खूप मोठी दुखपत झाली होती, दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते, त्यामध्ये रॉड टाकली होते मेंदूमध्ये खूप मोठा रक्त स...

पर्यावरण पूरक गणेशोत्सव अंतर्गत चंदगड तालुक्यातील गावांना कार्तिकेयन एस. ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांची भेट

Image
  पर्यावरण पूरक गणेशोत्सव अंतर्गत चंदगड तालुक्यातील गावांना कार्तिकेयन एस. ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांची भेट पर्यावरण पूरक गणेशोत्सव उपक्रम जिल्हा परिषद मार्फत दरवर्षी साजरा केला जातो. उपक्रमाचे हे अकरावे वर्ष असून यावर्षी देखील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमाला मिळाला आहे. या उपक्रमाचे नियोजन आणि सनियंत्रण जिल्हास्तरावरून केले जाते.   यावर्षीचा उपक्रम देखील यशस्वी व्हावा यासाठी ग्रामपंचायत निहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते.  या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.यांनी चंदगड तालुक्यातील गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. महिपाळगड हे 265 कुटुंब संख्या असलेल्या या गावांमध्ये सर्व कुटुंबानी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या उपक्रमासाठी गावाने  जलकुंड बांधलेले असून या जलकुंडामध्ये गावातील सर्व मूर्ती विसर्जित केल्या जातात. मूर्ती विसर्जनानंतर या कुंडामध्ये अमोनियम बायकार्बोनेट टाकले जाते जेणेकरून मुर्त्या विघटित होण्यास मदत होते. अशा पद्धतीने दुर्गम भागातील गावांनी देखील...

जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये 2 लाख 90 हजार मुर्ती संकलन.

Image
  जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये 2 लाख 90 हजार मुर्ती संकलन. दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये ग्रामस्थांकडून उत्स्फुर्त  प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमांतर्गत  एकूण 290748  मुर्ती संकलन तर सुमारे 492 टन इतके निर्माल्य संकलन करण्यात जिल्हा परिषदेला यश मिळाले आहे. विशेषत: या उपक्रमांतर्गत 2931 गणेशमुर्तींचे विजर्सन हे घरच्या घरीचं करण्यात आले. पंचगंगा प्रदूषणमुक्ती तसेच जिल्हयातील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने वर्ष 2015 पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या वर्षी ही जिल्हयातील सर्व गावांनी यामध्ये सहभाग घेवून उपक्रम यशस्वी केला.  या उपक्रमामध्ये जिल्हयातील सर्व ग्राम पंचायतींनी सहभागी होवून जलस्त्रोत प्रदूषण मुक्त ठेवणेबाबतचे आवाहन जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी,  कार्तिकेयन एस. यांनी केले होते.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी, कार्तिकेयन एस. यांनी चंदगड तालुक्यातील शिनोळी व महिपाळगड या गावांना भेट दे...

पर्यावरणपूरक घरगुती गौरी गणपती विर्सजनास नागरिकांचा उर्त्स्फत प्रतिसाद.

Image
  पर्यावरणपूरक घरगुती गौरी गणपती विर्सजनास नागरिकांचा उर्त्स्फत प्रतिसाद. इराणी खणीमध्ये 60,341 गणेश मुर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन. कोल्हापूर ता.03 :- घरगुती गौरी गणपती विसर्जनास शहरातील नागरीकांनी उत्सफुर्त प्रतिसाद देऊन 60,341 मुर्ती इराणी खणीमध्ये पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या. महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शहरातील नागरकांनी महापालिकेच्यावतीने ठेवण्यात आलेल्या पर्यावरण पूरक कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये व इराणी खणीमध्ये गणेश मुर्ती विसर्जित केल्या. पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्यावतीने शहरात ठिक ठिकाणी 160 पर्यावरण पूरक विसर्जन कुंडाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. या व्यतिरिक्त सार्वजनिक मंडळांनी, तालमींनी व संस्थांनीही काहीली व कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले होते.             घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेच्यावतीने सर्व यंत्रणा सकाळी 7 वाजल्यापासून दुस-या दिवशी पहाटे 4.30 वाजेपर्यंत काम करत होती. यामध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पवडी, आरोग्य विविध विभागाचे असे सुमारे 3000 कर्म...

जयसिंगपूरात सराईत गुन्हेगार सूरज पवार ताब्यात.

Image
  जयसिंगपूरात सराईत गुन्हेगार सूरज पवार ताब्यात. -------------------------------- जयसिंगपूर प्रतिनिधी नामदेव भोसले -------------------------------- उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. जयसिंगपूर पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार सूरज राजू पवार उर्फ गाडीवडर (रा. ५२ झोपडपट्टी, शाहूनगर, जयसिंगपूर, ता. शिरोळ) यास २ वर्षांकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले असतानाही तो रणवीर चौक गणेशमंडळ, शाहूनगर परिसरात आढळून आला. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकूर यांना बातमीदारामार्फत याची माहिती मिळताच त्यांनी पथकासह शाहूनगर येथे कडेकोट सर्च ऑपरेशन राबवले. यावेळी सूरज पवार याला ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४२ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक कोल्हापूर तसेच अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस अंमलदार संदीप बांडे, प्रकाश हंकारे , अभय सोनुले , निलेश शेवाले , विक्रम मोरे, सुप्रिया भेंडवडे , सुजाता चौगुले आदींचा समावेश होता. दरम्यान, शिरोळ, जयसिंगपूर, हात...

अंबप ग्रामपंचायतीचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम यशस्वी.

Image
  अंबप ग्रामपंचायतीचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम यशस्वी. -------------------------------- अंबप प्रतिनिधी  किशोर जासूद -------------------------------- माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत अंबप ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणपती विसर्जन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामपंचायतीच्या वतीने कृत्रिम कुंडांची सोय तसेच निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता कृत्रिम कुंडामध्ये केले. संकलित झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यात येणार आहे.सरपंच सौ. दीप्ती विकासराव माने व उपसरपंच आशिफ अबुबकर मुल्ला यांनी सांगितले की, “या उपक्रमाचा उद्देश निसर्गस्नेही गणेशोत्सव साजरा करून पर्यावरणाचे रक्षण करणे हा आहे. नागरिकांनी दिलेला प्रतिसाद अभिनंदनीय आहे.” या उपक्रमात गावातील तरुण मंडळे, महिला बचतगट, शाळा व सामाजिक संस्था यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यामुळे पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली. यावेळी गट विकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले शबाना मोकाशी यांनी अंबप ग्...

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू.

Image
  गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू. --------------------------------- मलकापूर प्रतिनिधी  रोहित पास्ते ---------------------------------    गणपती विसर्जनासाठी गावाकडे आलेल्या 31 वर्षीय तरुणाचा पाझर तलाव, पठाराचा वाडा (ता. शाहूवाडी) येथे बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आनंद काळू झोरे (वय 31, रा. येळवण जुगाई, पठाराचा वाडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी अंदाजे 5 वाजण्याच्या सुमारास पाझर तलावात ते बुडाले. घटनास्थळावरून प्रेत 3 सप्टेंबर रोजी सकाळी 2 वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आले. त्यांच्या मागे आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. आनंद झोरे हे मुंबई येथे नोकरीस होते. गणेश विसर्जनासाठी गावाकडे आले असता ही दुर्घटना घडली. शवविच्छेदन मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले. या घटनेचा तपास शाहूवाडी पोलीस ठाण्याचे हणमंत कुंभार करत असून पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

रोटरी क्लब ऑफ पिंपरी च्या खजानीस पदी स्मिता रानमाळे.

Image
  रोटरी क्लब ऑफ पिंपरी च्या खजानीस पदी स्मिता रानमाळे. --------------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी  विजय बकरे  --------------------------------- रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या खजानासपदी सरवडे (ता. राधानगरी )येथील सौ. स्मिता मनोहर रानमाळे यांची निवड करण्यात आली. पुणे येथे कार्यरत असलेल्या सौ. स्मिता या चार्टर्ड अकाउंटंट असून भोगावतीचे माजी कार्यकारी संचालक महादेवराव तिकोडे (गुडाळकर) यांच्या सुकन्या आहेत.  या निवडी प्रसंगी रोटरी क्लबचे प्रांतपाल संतोष मराठे, सहाय्यक प्रांतपाल प्रणिता आलूरकर,रवींद्र भावे, नूतन अध्यक्ष इरफान आवटे,शितल आवटे, क्लबचे माजी अध्यक्ष आर्यन आवटे आदी मान्यवर उपस्थित होते.  याप्रसंगी रोटरी क्लबच्या सहाय्यक प्रांतपाल प्रणिता आलुरकर यांच्या हस्ते सौ. स्मिता तिकोडे यांचा सत्कार करण्यात आला. या निवडी बद्दल स्मिता तिकोडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

बोंद्रे नगर परिसरातील 900 घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन.

Image
  बोंद्रे नगर परिसरातील 900 घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन.  --------------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी  विजय बकरे --------------------------------- कोल्हापुरातील बोंद्रेनगर परिसरातील 900 घरगुती गौरी गणपती विसर्जन कारीआई तरुण मंडळाने आयोजित केलेल्या कुंडामध्ये करण्यात आले असल्याची माहिती कारी आई तरुण मंडळाचे संस्थापक रिंकू उर्फ विजय देसाई यांनी , दैनिक सुपर भारत व फ्रंटलाईन चे प्रतिनिधी विजय बकरे यांना दिली विजय देसाई पुढे म्हणाले की कारीआई तरुण मंडळ गेली 38 वर्ष स्थापन करून विविध कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच पर्यावरणाला हानी पोहच वनये म्हणून कारीआई तरुण मंडळाच्या वतीने बोंद्रेनगर परिसरातील घरगुती गौरी गणपती विसर्जन कुंडामध्ये करण्याचा निर्णय मंडळामार्फत घेण्यात आला असून गेली पाच वर्षे चालू असून बोंद्रे नगर परिसरातील 9 00 घरगुती गौरी गणपती विसर्जन दुपारपासून चालू असून रात्री आठ वाजेपर्यंत गणपती विसर्जन सुरू होते तसेच हे 900 गणपती नगरपालिकेकडे देण्यात आली असून यासाठी का रीआई तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या जिद्दीने काम करीत असल्याचे रिंकू उर्फ विजय देसाई यांनी सा...

हिंगणगाव रण झुंजार गणेश मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन-लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील.

Image
  हिंगणगाव रण झुंजार गणेश मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन-लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील. --------------------------------- कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे --------------------------------- हिंगणगाव येथील रण झुंजार गणेश मंडळाच्या वतीने मंडळाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. अभिनंदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल जमादार, सचिव अविनाश माने, आशा गट प्रवतक पुनम माळी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि अनेक आरोग्य सेवक उपस्थित होते. यावेळी हिंगणगाव आरोग्य केंद्राच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुष्यमान भारत काडचे वाटप लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देहदान फॉर्म भरून घेण्यात आले. शिबिरात सर्वसामान्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, नेत्रतपासणी यांसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. नागरिकांन...

कसबा ठाणे येथे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन.

Image
कसबा ठाणे येथे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन. q कसबा ठाणे येथे संकल्प युवा फौंडेशन यांच्या वतीने सलग 8 व्या वर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जन व निर्माल्य गोळा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास कसबा ठाणे व महाडिकवाडी येथील गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 102 गणेश मूर्तींचे विसर्जन हे नदीमध्ये न करता गावातील पर्यावरणपूरक खणीत गणेश विसर्जन केले. या उपक्रमात फौंडेशनचे सदस्य, प्रशांत पाटील, नामदेव पाटील, सागर बा.पाटील, वैभव मोळे, सागर वि.पाटील, शुभम मेडसिंग, मनोहर मरळकर, विजय पाटील सर,राहूल पाटील, उमेश मेडसिंग इ. तसेच सर्व सभासद आणि गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांची शाळेला अनोखी भेट.

Image
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांची शाळेला अनोखी भेट. *विद्या मंदिर कोनोली तर्फ असंडोली शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री. ज्ञानदेव विठ्ठल पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात वडाचे झाड लावून  वृक्षारोपण केले आणि शाळेला सरस्वती मातेची सुंदर मूर्ती भेट म्हणून दिली. शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील यांना मुलींनी स्वतः तयार केलेला पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यापक श्री. डी एस पाटील सर, विषय शिक्षक श्री. सुहास पाटील सर ,अध्यापक श्री.आनंदा पाटील सर, श्री. सदाशिव अस्वले सर, सौ .नंदा जाधव मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.*

कांटे येथील गौरी गणपती विसर्जन सोहळा शोकाकुल भावनेत पार पडला.

Image
  कांटे येथील गौरी गणपती विसर्जन सोहळा शोकाकुल भावनेत पार पडला. --------------------------------- शाहुवाडी प्रतिनीधी  आनंदा तेलवणकर ---------------------------------    शाहुवाडी : कांटे येथील गौरी सह आपल्या लाडक्या गणरायाला निराशजनक स्वरूपात निरोप देण्यात आला .  यावेळी कोणत्याही प्रकारची घोषणा तसेच कोणत्याही प्रकारचे वाघ्य वाजवण्यात आले नाही            कारण गणपती आगमनाच्या आदल्या दिवशी कांटे येथील तरूण विश्वास कृष्णात चव्हाण वय वर्षे24 या तरुणाचा लोणावळ्या जवळ अपघात होवून त्याचा मृत्यू झाला होता तर आज गणपती विसर्जनाच्या काही वेळे अगोदर वालुबाई आनंदा चाळके यांचे निधन झाले त्यामुळे गावात शोककळा पसरून गावात शांततामय वातावरण निर्माण झाले होते तसेच गावातील दोन्हीं ही मंडळांनी कोणत्याही प्रकारचे वाद्य किंवा भोंगा लावला नाही तसेच गणरायाचे विसर्जन शांततेत पार पडले यावेळी गावचे पोलीस पाटील जगदीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते

गणपती विसर्जन मिरवणुकीत रंकाळ्यात पडलेल्या आजींना अग्निशामक दलांच्या जवानांनी दिलं जिवदान.

Image
  गणपती विसर्जन मिरवणुकीत रंकाळ्यात पडलेल्या आजींना अग्निशामक दलांच्या जवानांनी दिलं जिवदान. --------------------------- सलीम शेख  --------------------------- कोल्हापूर  : घरगुती गणपती विसर्जन सुरू असताना, रंकाळा तलावात पडल्या असता अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ पाण्यात उड्या मारत त्यांना पाण्यातून बाहेर काढून कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, आज, दिनांक २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गणपती विसर्जन काळात रंकाळा परिसरात कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आपले कर्तव्य बजावत होते. त्याचवेळी, एका वृद्ध महिला (आजी) अचानक रंकाळा तलावात पडल्या. यावेळी अग्निशामक जवान उदय शिंदे, सुरेंद्र जगदाळे, फायर विद्यार्थी आदिम लाटकर, पार्थ पाटील यांनी आजीला पाण्यातून  बाहेर काढण्यास व्हाईट आर्मी च्या साक्षी गोरे व  सानिका पवार यांचे सहकार्य लाभले. पाण्याबाहेर काढल्यावर आजी बेशुद्ध अवस्थेत होत्या, . त्याचवेळी, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीही धाव घेत आजींना तातडीने रुग्णवाहिकेतून सीपी...

एकीकडे सज्जनगड परळी येथील ग्रामस्थानी पर्यावरण पूरक गणपती विसर्जन केले तर दुसरीकडे साताऱ्यातुन आलेल्या नागरिकांच्या कृतीतून विरोधाभास दिसून आला.

Image
  एकीकडे सज्जनगड परळी येथील ग्रामस्थानी पर्यावरण पूरक गणपती विसर्जन केले तर दुसरीकडे साताऱ्यातुन आलेल्या नागरिकांच्या कृतीतून विरोधाभास दिसून आला.  -----------------------------------------  सातारा जिल्हा प्रतिनिधी   अमर इंदलकर  -----------------------------------------  सज्जनगड परळी हे सातारा जिल्ह्यातील एक छोटेसे गाव- उरमोडी धरण उशाशी असणारे आणि उत्तरेस शंभर मिटरच्या वर्तुळात उरमोडी नदी असे हे सर्वसोयीयुक्त असे गाव.पाच दिवसानंतर बहुतांश घरातील गणपती बाप्पाचे पारंपरिक विसर्जन हे होत असते. ते विसर्जन हे पर्यावरण पूरक करण्याचा उपक्रम परळी येथील ग्रामस्थानी पार पाडला. ग्रामपंचायत सरपंच- बाळासाहेब विठोबा पाटील तसेच ग्रामसेवक-नितीन पवार यांच्या मार्गदर्शनात उपसरपंच - समीर आसिफ मुलाणी, ग्रामपंचायत सदस्य -शेखर गोकुळ जांभळे,आणि अन्य सर्व सदस्य,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी- संतोष नंदकुमार धोत्रे. तसेच परळी गावातील सर्व ग्रामस्थ ह्यांनी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन कार्यक्रम सोहळा पार पाडला.दुसरीकडे साताऱ्याहून परळीच्या दिशेने गजवडी फाट्यानजीक उरमोडी नदीवर एक पू...

उमळवाड : गावातील माजी उपसरपंच ‘भैय्या’ यांच्या सावकारीप्रकरणावरुन खळबळ.

Image
  उमळवाड : गावातील माजी उपसरपंच ‘भैय्या’ यांच्या सावकारीप्रकरणावरुन खळबळ. ------------------------------------- जयसिंगपूर प्रतिनिधी नामदेव भोसले ------------------------------------- उमळवाड गावातील माजी उपसरपंच ‘भैय्या’ यांच्या सावकारी व्यवहाराची चर्चा गावभर रंगली आहे. एका गरीब कुटुंबाला दिलेल्या एक लाख रुपयांच्या कर्जावर तब्बल १० टक्के दराने व्याज आकारण्यात आले. या कर्जासाठी कर्जदाराकडून कोरा चेक व दुचाकी वाहने जामीन म्हणून घेतली गेली होती. सात महिन्यांनंतर कर्जदाराने मुख्य रक्कम आणि व्याजाची रक्कम परतफेड केल्यानंतरही सुरक्षित केलेली वाहने परत मिळाल्यानंतर व्यवहार संपला, असे मध्यस्थांनी सांगितले. मात्र, “पैसे अद्याप बाकी आहेत, नाही दिले तर कोरा चेक वटवू” अशी धमकी संबंधित कुटुंबाला देण्यात आली. या प्रकारामुळे संपूर्ण गावात सावकारी प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. गावात इतर सावकारांकडूनही कर्जदारांची गावे, वाहनं आणि घरगुती साहित्य ताब्यात घेण्याचे प्रकार होत आहेत. कर्जदाराला दिवसभर बदनाम करणे, शिवीगाळ करणे, मानसिक त्रास देणे, मागासवर्गीय युवकांचा वापर करुन दहशत माजवणे असे प्रकार सुरू ...

अंबपमध्ये श्री बापूसाहेब यशवंत पाटील सहकारी दूध उत्पादक संस्थेची ५५ वी वार्षिक सभा उत्साहात.

Image
  अंबपमध्ये श्री बापूसाहेब यशवंत पाटील सहकारी दूध उत्पादक संस्थेची ५५ वी वार्षिक सभा उत्साहात. -------------------------- किशोर जासूद -------------------------- अंबप :श्री बापूसाहेब यशवंत पाटील सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, अंबपची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या श्री बापूसो यशवंत पाटील (अण्णा) सभागृहात मोठ्या खेळीमेळीत पार पडली. या सभेस डॉ. अशोक पाटील (संकलन अधिकारी व महाव्यवस्थापक, श्री वारणा दूध संघ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात श्री बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूहातील सर्व संस्था आदर्शवत कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार काढले. --- संस्थेची आर्थिक कामगिरी संस्थेचे चेअरमन अँड. राजवर्धन पाटील यांनी अहवाल सादर करताना सांगितले की, संस्थेची दूध विक्री : ₹१ कोटी ७९ लाख ८४ हजार एकूण नफा : ₹१३ लाख ४७ हजार डिव्हिडंड : १२% जाहीर वार्षिक उलाढाल : ₹२ कोटी ४५ लाख ६२ हजार ठेवी : ₹४२ लाख ६१ हजार गुंतवणूक : ₹१० लाख ९० हजार राखीव निधी व इतर निधी : ₹६४ लाख ०६ हजार इतर येणी : ₹३८ लाख ५० हजार --- शेतकरी हितासाठी योजना संस्थेमार्फत म्हैस खरेदी अनुदान, चाफ कट्ट...

श्री खणाई देवी मित्र मंडळाचा महाप्रसाद उत्साहात संपन्न.

Image
  श्री खणाई देवी मित्र मंडळाचा महाप्रसाद उत्साहात संपन्न. ---------------------------- संस्कार कुंभार  ---------------------------- नागाव : श्री खणाई देवी मित्र मंडळाच्या महाप्रसादा  वेळी सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील अध्यक्ष विकास आघाडी उपस्थित होते  सत्कार करण्यात आला यावेळी श्री खणाई देवी मित्र मंडळ यांच्यातर्फे श्री  महाप्रसादाच्या वेळी प्रकाश कोळी शिवाजी कांबळे अध्यक्ष कुमार सुतार उपाध्यक्ष सागर कांबळे खजानिस मयुरेश पवार महाप्रसादाचे सर्व कार्यकर्ते श्रेयस कांबळे व भजनी मंडळ अध्यक्ष सज्जन कांबळे यांनी शिंदे साहेब दत्तात्रेय कांबळे साहेब प्रसाद कोळी शंकर साळे परशुराम सुतार महेश कांबळे आनंद कांबळे कार्यकर्ते उपस्थित होते मंडळाला विशेष सहकार्य  प्रसाद पाटील सिल्वर लाईन फॅब्रिकेशन व निशिकांत कोळी यांच्याकडून चांदी आपण व सोन्या पवार यांच्याकडून विशेष सहकार्य व कै सुनील साळे यांचे पण मोठे योगदान होते मागील वर्षी व मूर्ती देणगीदार कुमार सांगोलकर  खणाई देवी मित्र मंडळाकडून सर्वांचे आभार

डॉ. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांची टेक्नोलर्न पुणे कंपनीत निवड.

Image
 डॉ. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांची टेक्नोलर्न पुणे कंपनीत निवड.  --------------------------------- नामदेव भोसले --------------------------------- जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ४ विद्यार्थ्यांची टेक्नोलर्न, पुणे या नामांकित कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे. ही माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सौरभ खानावळे यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर विभागाचे आकाश रक्ताडे, आदित्य राज देसाई, एमसीए विभागाचा आशितोष पाटील व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाची श्रेया माने यांचा समावेश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक रु. २.८ लाख ते ७ लाख इतक्या पॅकेजवर नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड उपस्थित होते. निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्ल...

राधानगरी परिसरातील घरगुती गौरी गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात.

Image
  राधानगरी परिसरातील घरगुती गौरी गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात. ---------------------------- राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ---------------------------- राधानगरी परिसरातील घरगुती गौरी गणपती राधानगरी जवळ असणाऱ्या ओढ्याजवळ विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले राधानगरी जुने पेठ हुडा शेटके वाडी आयरे वाडी गावठाण चांभार वाडा हरिजन वाडा येथील गौरी गणपती वाजत गाजत आज दुपारपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत विसर्जन करण्यात आले राधानगरी ग्रामपंचायत कडून गौरी गणपती दान करून पर्यावरण जागा असे असा फलक ट्रॅक्टर ट्रॉलीवर लावण्यात आला होता अशा पद्धतीने घरगुती गौरी गणपती मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले

जाखले गावात सलग ९ वर्षे पर्यावरणपूरक मूर्तिदान उपक्रम.

Image
  जाखले गावात सलग ९ वर्षे पर्यावरणपूरक मूर्तिदान उपक्रम. -------------------------------------- बच्चे सावर्डे प्रतिनिधी  सुनिल पाटील -------------------------------------- जाखले : गावात सलग नऊ वर्षांपासून मूर्तिदान चळवळ यशस्वीपणे सुरू असून यावर्षीही मोठ्या उत्साहात हा उपक्रम पार पडला. गावातील घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी सार्वजनिक पानवट्याचा वापर न करता प्रत्येक गल्लीमध्येच विसर्जनाची सोय तसेच निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमात सरपंच सौ. जयश्री महादेव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, तरुण मंडळे व सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावर्षी साधारण ६२५ गौरी-गणपती मूर्तींचे संकलन करून त्यांचे निर्वात ठिकाणी विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले. या उपक्रमामुळे पाणी प्रदूषण टळून परिसर स्वच्छ राहिला असून, पर्यावरण जनजागृती, समाजप्रबोधन, सामाजिक बांधिलकी व गावकऱ्यांमधील ऐक्य वृद्धिंगत झाले आहे. या प्रसंगी श्री. राहुल देशमुख सर, कैलास पाटील (वकील), ज्योतीराम पाटील, महादेव देशमुख, वैभव शिंदे तसेच सर्व गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित होते. 🌿 जाखले गावचा हा उपक्रम पर्य...

मल्हार पेठ मधील कोसळलेल्या घरातील जखमीचा मृत्यु

Image
  मल्हार पेठ मधील कोसळलेल्या घरातील जखमीचा मृत्यु. ----------------------------- कळे प्रतिनिधी साईश मोळे -----------------------------   कळे:- मल्हारपेठ ता. पन्हाळा येथे पावसाने राहते घर अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या रंगराव दत्तू मोरे ( वय 70) या वृद्धाचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी मृत्यू झाला . याबाबत अधिक माहीती अशी 19 ऑॅगस्ट रोजी रात्री 8 वाजता जोरदार पावसाने लगतच्या घराची भिंत रंगराव मोरे यांच्या राहत्या घरावर कोसळून संपूर्ण राहते घर उध्वस्त झाले . घरातील व्यक्ती रंगराव मोरे .राधिका मोरे व समिक्षा कापसे हे तिघे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून जखमी झाले होते . यातील रंगराव मोरे हे गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते . मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यु झाला .त्याच्या पश्चात मुलगा तीन मूली .सुन .नातवंडे असा परिवार आहे . कोल्हापूर विभाग.

तांब्याचे बंब चोरणाऱ्याला अटक, १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Image
  तांब्याचे बंब चोरणाऱ्याला अटक, १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. -------------------------- शशिकांत कुंभार. -------------------------- कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पोलिसांनी तांब्याचे बंब चोरी करणाऱ्या एका चोरट्याला अटक करून त्याच्याकडून तब्बल १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत चोरीला गेलेले पाच तांब्याचे बंब आणि एक हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर, २०२५ रोजी कोपर्डे येथील रहिवासी रणजित पाटील यांच्या घराजवळून एक तांब्याचा बंब चोरीला गेला होता. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीला तात्काळ पकडण्यात आले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने आणखी चार तांब्याचे बंब चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेले पाचही बंब आणि चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल जप्त केली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख रुपये आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून ...

कुंभोज दुर्गेवाडी परिसरात घरगुती गणरायाला भावपूर्ण निरोप.

Image
कुंभोज दुर्गेवाडी परिसरात घरगुती गणरायाला भावपूर्ण निरोप. --------------------------------- कुंभोज प्रतिनिधी --------------------------------- – कुंभोज गावातील दुर्गेवाडी परिसरात घरगुती गणपती विसर्जनाचा कार्यक्रम भक्तिभावात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. गणेश चतुर्थीपासून घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पाला मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) मोठ्या उत्साहात आणि गजरात निरोप देण्यात आला. घराघरातून “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात बाप्पांचे विसर्जनासाठी नेण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, फुग्यांनी सजवलेले रस्ते, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते. परिसरातील नागरिकांनी पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन घरच्या घरी किंवा तलावात केले. काही नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने पाण्यातील मूर्तींची पूजन करून विसर्जन केले. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमात पाहायला मिळाला. स्थानिक मंडळांनी आणि पोलिस प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीसाठी योग्य ती व्यवस्था केली होती. सुरक्षिततेसाठी स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचारी ...

पन्हाळा तालुक्यातील कोतोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, ५ जण ताब्यात.

Image
  पन्हाळा तालुक्यातील कोतोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, ५ जण ताब्यात. ------------------------------  शशिकांत कुंभार  ------------------------------ कोतोली ता. पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील कोतोली गावात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ३ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. कोतोली येथील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या छाप्यात पोलिसांनी प्रकाश हिंदुराव लव्हटे, संदीप नामदेव लव्हटे, सर्जेराव श्रीपती मेंगाणे, दीपक शिवाजी गवळी आणि समर्थ पांडुरंग पाटील (सर्व रा. कोतोली) यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख २२,५०० रुपये, पाच मोबाईल हँडसेट, पाच दुचाकी आणि जुगाराचे साहित्य जप्त क...

कागल येथे सोन्याचे दागिने चोरल्याच्या संशयाने निपाणीच्या महिलेस अटक.

Image
  कागल येथे सोन्याचे दागिने चोरल्याच्या संशयाने निपाणीच्या महिलेस अटक. ---------------------------  सलीम शेख ---------------------------  :कागल बस स्थानकावर संशयास्पद फिरणाऱ्या निपाणीच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी -मंगळसूत्र जप्त केले आहे. ही घटना तारीख 30 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.        सदरची महिला ही कागल बस स्थानक परिसरात संशयास्पद फिरत होती. नागरिकांनी पाठलाग करून तिला पकडले व कागल पोलिसांच्या स्वाधीन केली. तिच्याकडे तुटलेले चार ग्रॅम वजनाचे मणी- मंगळसूत्र सापडले. याबाबत चौकशी केली असता मालकी हक्काबाबत कोणताही पुरावा तिच्याकडे नव्हता, म्हणून महिला पोलीस अंमलदार शालिनी नवलसिंग मावळे यांनी पोलिसात रात्री उशिरा तक्रार नोंदवली.            कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची शतकोत्तर परंपरा.

Image
  पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची शतकोत्तर परंपरा. -------------------------------- बाजार भोगाव सुदर्शन पाटील  --------------------------------     गणपती म्हटले की डोळ्यांसमोर येतात त्या रंगीबेरंगी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती; मात्र पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फे बोरगाव या गावाने गेली शंभराहून अधिक वर्षे शाडूच्या मातीच्या मूर्ती बसवण्याची परंपरा जपली आहे. गावची ही परंपरा असली तरी पर्यावरणपूरकतेचा आदर्शवत संदेश ती देत आहे. गणेशोत्सव धार्मिक महत्त्वाचा असला तरी प्लास्टर, रासायनिक रंग व निर्माल्यामुळे होणारे प्रदूषण गंभीर प्रश्न बनले आहेत. यासाठी शासन व सामाजिक संस्था जनजागृती करत आहेत. मात्र पोहाळे तर्फ बोरगाव गाव मात्र या साऱ्या प्रदूषणापासून दूर आहे. येथे गणेशमूर्ती पूर्णपणे शाडूमातीच्या व रंगविरहित असल्याने जलप्रदूषण होत नाही.     गावातील तरुण व ग्रामस्थांनी घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांत अशा मूर्ती बसवून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची शतकोत्तर परंपरा कायम ठेवली आहे. पर्यावरण जागृतीचा संदेश देणाऱ्या या गावचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. चौकट गावात एकूण १० गणेश...

जुगार खेळणाऱ्यांवर हातकणंगले पोलिसांची कारवाई

Image
 जुगार खेळणाऱ्यांवर हातकणंगले पोलिसांची कारवाई.  ------------------------------  शशिकांत कुंभार   ------------------------------ कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील चोकाक परिसरात अवैधरीत्या तीन पत्त्यांचा जुगार खेळत असलेल्या चार इसमांवर हातकणंगले पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई पोलिस कॉन्स्टेबल राहुल परशराम टोणपे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. कारवाईत ताब्यात घेतलेले आरोपी पुढील प्रमाणे  गोरेसाब गुलाब पेंढारी (रा. मुडशिंगी) विजय आदिनाथ समगे (रा. चोकाक) रोहित रावसाहेब बुकशेटे (रा. चोकाक) सोमनाथ शामराव अनुसे (रा. मुडशिंगी) अशी आहेत. मोबाईल फोन (विवो, ओपो, सॅमसंग, रेडमी) – अंदाजे किंमत 46,000/- रुपये,रोख रक्कम – 2,800/- रुपये तीन पत्त्यांचे संच, तीन मोटारसायकली – अंदाजे किंमत 1,50,000/- रुपये जुगार खेळताना वापरलेली 1,300/- रुपयांची चलनी नोटा असा एकूण  ₹ 2,04,300/-रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक करोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू ...

कामधेनू दूध संस्थेच्या अध्यक्षपदी विनोद पाटील.

Image
  कामधेनू दूध संस्थेच्या अध्यक्षपदी विनोद पाटील. कामधेनू सहकारी दूध संस्थेच्या नव्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी विनोद पाटील यांची तर उपाध्यक्षपदी आत्माराम गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विश्वास पाटील होते. बैठकीस संचालक शशिकांत पाटील, मोहन पाटील, सय्यद पठाण, पांडुरंग मुळीक, अधिक पाटील, संजय दाभाडे, अनिल पाटील, सर्जेराव शेटके, विभा पाटील, संतोष पाटील, सुभाष सवळेकरी, प्रकाश पाटील यांच्यासह उपसरपंच, सरपंच शिवाजी जाधव, श्रीधर पाटील, राजेंद्र मुळीक, अजित पाटील, अमर मुळीक, निवृत्ती गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. निवड झाल्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

जयसिंगपूरात बोगस डॉक्टर व मेडिकलमधून गर्भपात किटचा पुरवठा? बेकायदेशीर कारभारावर नागरिक संतप्त; चौकशीची मागणी.

Image
  जयसिंगपूरात बोगस डॉक्टर व मेडिकलमधून गर्भपात किटचा पुरवठा? बेकायदेशीर कारभारावर नागरिक संतप्त; चौकशीची मागणी. ----------------------------------- जयसिंगपूर प्रतिनिधी नामदेव भोसले ----------------------------------- जयसिंगपूर  गर्भलिंग-निदान प्रकरणामुळे उचललेली खळबळ अजून शांत होण्याआधीच जयसिंगपूरातून नवा धक्कादायक मुद्दा समोर आला आहे. शहरातील पाटील, डिग्रजे व इतर हॉस्पिटल्समध्ये तसेच काही मेडिकलमधून बेकायदेशीररित्या गर्भपातासाठी औषधांची “किट” पुरवली जात असल्याचा आरोप होत आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, “पाटील बाई” नावाची एजंट या संपूर्ण रॅकेटमध्ये प्रमुख भूमिका बजावत असून, तिच्यामार्फत काही बोगस डॉक्टर व फार्मासिस्ट महिलांशी संपर्क साधतात. गर्भलिंग-निदानानंतर इच्छुक महिलांना सुमारे २० हजार रुपयांत औषधांची किट दिली जाते, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणामुळे शहरातील नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. “जिल्ह्यात सतत कारवाया सुरू आहेत, तरी जयसिंगपूरातील बेकायदेशीर कारभारावर अजूनही लगाम का नाही?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. काही सामाजिक संघटनांनी “तातड...

कोतोलीत अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड५ इसमांकडून ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Image
  कोतोलीत अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड५ इसमांकडून ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. ---------------------------------- कोतोली प्रतिनिधी ---------------------------------- पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत तब्बल ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोतोलीतील हिंदुस्थान ढाबा येथे छापा टाकून ही कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळावरून रोकड, जुगार साहित्य, मोबाईल फोन असा एकूण ३,१२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईदरम्यान शशिकांत श्रीपति चव्हाण (रा. कोतोली), यशवंत विठ्ठल पाटील (रा. कोतोली) यांच्यासह एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक श्री. बी. श्रीनिवास, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सावळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे...

गड मुडशिंगी येथे भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा.

Image
  गड मुडशिंगी येथे भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा. ----------------------------------- शशिकांत कुंभार ----------------------------------- दि.31 आँगस्ट हा भटके विमुक्त दिवस साजरा करीत असुन राष्ट्रीय स्तरावर OBC असलेल्या या भटक्यांच्या जीवनात क्रांती होवो,पिढ्यानपिढ्याचे सामाजिक मागासलेपण नष्ट होवो, भटकंतीच्या फे-यातून मुक्ती मिळो. भटक्यांची नोंद घेणारे त्यांच्या भल्यासाठी योगदान देणारे,कायदा करणाऱ्या डाँ.बाबासाहेब आंबेडकर,ब्रिटिश अधिकारी स्टार्ट,न्यायमूर्ती काकासाहेब कालेलकर, दिवंगत माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग,न्या.बी.पी.मंडल यांच्या योगदानाची सुर्य आणि चंद्र असेपर्यंत भटक्यांना आठवण राहील. भटक्यांचे यातनामय,संघर्षमय जीवन आणि मरण प्रत्यक्ष पाहुन कागदावर नोंद घेतांना आसवांची टीपूस पडलेली अनेकांनी पाहिली होती.त्यांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक मागासलेपण दुर करण्यासाठी त्यांना केवळ आरक्षणाच्या माध्यमातून संधी देता येईल.सरकारने तयार केलेल्या योजना भटक्यांच्या वाडी,वस्ती, तांड्यावर केंव्हा पोहचेल माहिती नाही मात्र त्यांना तातडीने आरक्षण दिले पाहिजे यासाठी डाँ.बाबासाहेब आंबेडकर य...

पवित्र रिश्ता’ फेम प्रिया मराठेचं कर्करोगाने निधन!कर्क रोगासोबतची झुंज अखेर अपयशी.

Image
  पवित्र रिश्ता’ फेम प्रिया मराठेचं कर्करोगाने निधन!कर्क रोगासोबतची झुंज अखेर अपयशी. --------------------------- तुषार पाचलकर ---------------------------  ‘पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथियाँ’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या हिंदी आणि मराठी मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं आहे. वयाच्या 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. आज (रविवार) पहाटे चार वाजता कर्करोगाने प्रियाचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षभरापासून प्रिया लाइमलाइटपासून दूरच होती. सोशल मीडियावरही ती सक्रिय नव्हती. अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. प्रिया शेवटची ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. परंतु ही मालिकासुद्धा तिने मधेच सोडली होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं. “आरोग्याच्या कारणास्तव मी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा निरोप घेत आहे. या मालिकेत मोनिकाची भूमिका साकारताना मी...

गणेशोत्सवातील महाप्रसाद रद्द करून मुंबईच्या मराठा आंदोलकांना अल्पोपहार पाठवला सुरूपलीच्या गणेश तरुण मंडळाचा विधायक कार्यक्रम.

Image
गणेशोत्सवातील महाप्रसाद रद्द करून मुंबईच्या मराठा आंदोलकांना अल्पोपहार पाठवला सुरूपलीच्या गणेश तरुण मंडळाचा विधायक कार्यक्रम. ----------------------------- जोतीराम कुंभार -----------------------------      सुरुपली (ता.कागल) येथील गणेश तरुण मंडळाने उत्सवातील महाप्रसाद रद्द करून त्याच रकमेतून मुंबईच्या मराठा आंदोलकांना अल्पोपहार पाठवला.       जनसेवा हीच ईश्वरसेवा या भक्तीतत्वानुसार या मंडळाने मुंबईतल्या आंदोलकांची मदत करायचे ठरवले.पावसात सुद्धा मराठा आरक्षणाचा लढा देणाऱ्या आंदोलकांचे खाण्या पिण्याचे हाल होत होते.त्यांच्या साठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण मदत केली पाहिजे.किंबहुना तीच खरी गणेश भक्ती असे मानून मंडळाने आंदोलकांना केळी,बिस्किटे,चिवडा,पाण्याच्या बाटल्या असे अल्पोपहार साहित्य पाठवले.सर्व साहित्य एका टेम्पो ट्रक मध्ये भरून रातोरात मुंबईच्या आझाद मैदानावर पोचवले.मराठा आरक्षण आंदोलनास कृतीतून पाठिंबा देणाऱ्या या मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.इतरही कांहीं मंडळानी हा आदर्श घेण्याचे ठरविले आहे.     मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस ...

गणेशोत्सव सामाजिक सलोख्याचा आदर्श – अमोल ठाकूर.

Image
  गणेशोत्सव सामाजिक सलोख्याचा आदर्श – अमोल ठाकूर. ---------------------------- हातकणंगले प्रतिनिधी  नामदेव भोसले ----------------------------  गणेशोत्सव हा केवळ आनंद, उत्साह आणि भक्तीचा सण नसून तो समाजात एकता, सांस्कृतिक जाणीव आणि सार्वजनिक हित जपणारा सण आहे. त्यामुळे प्रत्येक गणेश मंडळाने समाजोपयोगी व प्रेरणादायी उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने उत्सवाचा आदर्श घडवावा, असे आवाहन जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी नुकतेच केले. गणेशोत्सव काळात गणेश मंडळांनी आरास व मिरवणुकीपर्यंतच स्वत:ला मर्यादित न ठेवता, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी, पर्यावरण संवर्धन असे समाजहिताचे उपक्रम आयोजन करावेत, अशी सूचना श्री. ठाकूर यांनी केली. "प्रत्येक मंडळाने आपल्या परिसरात काहीतरी वेगळे करुन समाजासाठी उदाहरण घडवावे," असा संदेश त्यांनी दिला. यावेळी त्यांनी उत्सव काळात सुरक्षिततेसाठी मंडपात CCTV कॅमेरे बसवावेत, गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही आवाहन केले. उल्लेखनीय उपक्रम आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या मंडळांना विशेष पुरस्कार व सन्मान दे...

पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे गणेशोत्सव आणि सत्यनारायण पूजेचा उत्साह.

Image
  पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे गणेशोत्सव आणि सत्यनारायण पूजेचा उत्साह. ------------------------------------------- बच्चे सावर्डे प्रतिनिधी  सुनिल पाटील  ------------------------------------------- पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावामध्ये सर्वत्र मंगलमय व आनंदी वातावरण पसरले होते. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील भटजींनी मंत्रोच्चार करत पूजेचे पौरोहित्य केले. गावकरी मोठ्या संख्येने या पूजेत सहभागी झाले. त्यांच्या सहभागामुळे श्रद्धा, भक्ती आणि एकोप्याचे दर्शन घडले. पूजनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सातवे व परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी गावात भक्तिरसाने भरलेले वातावरण अनुभवायला मिळाले. गणेशोत्सवाच्या काळात विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. एकत्रितपणे साजरा केलेल्या या सोहळ्याने सामाजिक सलोखा, ...

गौरी आल्या सोन्याच्या पावलाने हे गीत गात शनिवार पेठ व परिसरातील गौरीची आगमन.

Image
  गौरी आल्या सोन्याच्या पावलाने हे गीत गात शनिवार पेठ व परिसरातील गौरीची आगमन. -------------------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी  विजय बकरे -------------------------------------- कोल्हापुरातील शनिवार पेठ व परिसरातील महिला व लहान मुली पंचगंगा घाटावर गौराई आल्या सोन्याच्या पावलांनी हे गीत गात आपापल्या घरी आगमन मोठ्या उत्साहात आणण्यात आल्या कोल्हापुरातील शनिवार पेठ व परिसरातील महिला व मुली नटून थटून पंचगंगा घाटावर गौरी आणण्यासाठी जमा झाल्या आणि पंचगंगा घाटावर गौरी तांब्यात भरून त्या पंचगंगेवर गौरीची गाणी व फुगड्या घालण्यात आल्या त्यानंतर एकत्र महिला व मुली गौरी घेऊन वाजत गाजत आपापल्या घरी गौरी आली सोन्याच्या पावलाने हे गीत गात घरी गेल्यावर त्या गौरीचा औक्षण करून घरामध्ये घेण्यात आल्या त्या गौरी गणपतीच्या शेजारी ठेवण्यात आल्या असून शनिवार पेठेतील एका घरामध्ये गौरीला मुगुट घालून साडी नेसून सजवण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत होते अशा पद्धतीने गौरी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

रागोळीच्या रेषांतून साकारली आमदार विनय कोरे यांची प्रतिकृती — कलाकार सतिश कुंभार यांचा अद्वितीय आविष्कार.

Image
  रागोळीच्या रेषांतून साकारली आमदार विनय कोरे यांची प्रतिकृती — कलाकार सतिश कुंभार यांचा अद्वितीय आविष्कार. ----------------------------- कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ----------------------------- प्रसिद्ध रांगोळी कलाकार सतीश कुंभार यांनी आपल्या सर्जनशीलतेचा अजून एक ठसा उमटवत आमदार विनय कोरे यांची भव्य प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून बाहुबली येथे साकारली आहे. बाहुबली येथील कल्लाप्पा आण्णा कोल्हापूरे हॉल येथे येथे आमदार अशोकरावजी माने व विनय रावजी कोरे यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या यात्री निवासाच्या लोकातून सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या या कलाकृतीने कोल्हापूर जिल्ह्यातील कला क्षेत्रात विशेष लक्ष वेधून घेतले आहे.सतीश कुंभार हे रांगोळी कलेसाठी ओळखले जाणारे नाव असून, त्यांनी यापूर्वीही अनेक राष्ट्रीय नेत्यांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची प्रतिकृती रेखाटल्या आहेत. मात्र, आमदार विनय कोरे यांचं व्यक्तिमत्त्व रंगरेषांमध्ये उतरवणं हे त्यांच्यासाठी एक वेगळंच आव्हान होतं, असं त्यांनी सांगितलं. यावेळी आमदार विजयरावजी कोरे व आमदार अशोक रावज...