Posts

Showing posts from August, 2025

बाजार भोगाव बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा विळखा प्रशासन अलर्ट मोडवर.

Image
  बाजार भोगाव बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा विळखा प्रशासन अलर्ट मोडवर. ------------------------------ बाजार भोगाव  सुदर्शन पाटील  ------------------------------ गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कासारी व जांभळी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून बाजार भोगाव येथील मोडक्या ओढ्यावरती पाणी आल्याने कोल्हापूर हुन बाजार भोगाव अनुस्कुरा मार्गे राजापूर रत्नागिरीला जाणारा मार्ग दुसऱ्यांदा बंद झाला आहे  दरम्यान बाजार भोगाव येथील बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा विळखा पडला असून काही दुकानात पाणी शिरले आहे संभाव्य पुराच्या पार्श्वभूमी वरती प्रशासन अलर्ट झाले असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यक असणारी बोट सज्ज ठेवण्यात आली आहे त्याचबरोबर इतर यंत्रसामग्री देखील प्रशासनाकडून  सज्ज ठेवण्यात आली आहे दरम्यान कासारी नदीच्या पाणी पातळी सातत्याने वाढ होत असून बाजार भोगाव बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी संभाव्य महापुराचा धोका ओळखून आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे   तसेच पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे...

बोरबेट येथील महिला प्रस्तुत होऊन अर्भक मृत्यू व बाळतीन सुखरूप.

Image
बोरबेट येथील महिला प्रस्तुत होऊन अर्भक मृत्यू व बाळतीन सुखरूप. ---------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी  विजय बकरे ---------------------------- गगनबावडा तालुक्यातील महिलेची 108 रुग्णवाहिकेमध्येच प्रस्तुती पण प्रस्तुती नंतर अर्भक बालकाचा मृत्यू व आई सुखरूप गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील महिला कल्पना आनंदा डुकरे वय 29 या महिलेला प्रसुती साठी सकाळी दहा वाजता ग्रामीण रुग्णालय गगनबावडा या ठिकाणी आणली असता त्या महिला प्रसूती कळ असल्याने त्या महिलेला प्रसूती रुग्णवाहिकेमध्ये उपचारादरम्यान अर्भक बालकाचा मृत्यू झाला व त्या महिलेच्या प्रकृतीमध्ये बदल झाल्याने पुढील उपचारासाठी सीपीआर कडे पाठवण्यात आले आहे त्यादरम्यान तालुक्यामध्ये पूर परिस्थिती असल्यामुळे ठीक ठिकाणी मेन रोड वरती पाणी आल्याने रुग्णाची व आरोग्य विभागाची चांगलीच तारांबळ उडाली गगनबावडा मेन रोड वरती पाणी आल्याने 108 रुग्णवाहिकेचे चालक सतीश कांबळे यांनी तारेवरची कसरत करत रुग्णवाहिका पाण्यातून मार्ग काढत कोल्हापूरच्या दिशेने रवाना केली कोल्हापूर गगनबावडा रोड वरती पुराचे पाणी असल्याने रुग्णाला गगनबावड्यातून असळज पर्...

राज्य सरकारचे 50 हजाराचे अनुदान खरोखरच गोर गरिबांच्या घराचा स्वप्रसिद्धीचा मार्ग मोकळा होणार का?

Image
  राज्य सरकारचे 50 हजाराचे अनुदान खरोखरच   गोर गरिबांच्या घराचा स्वप्रसिद्धीचा मार्ग मोकळा होणार का?  ------------------------------- मिरज तालुका प्रतिनिधी  राजू कदम ------------------------------- फडणवीसांची मोठी घोषणा पण अंमलबजावणी कितपत गतीने होणार. राज्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ३० लाख घरांना आता मोफत वीज मिळणार आहे. या प्रत्येक घरावर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकारकडून ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. सोलापूरमधील दहिणटे आणि शेळगी येथे बांधलेल्या सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, “गरीब आणि निम्नमध्यमवर्गीय कुटुंबांना दर्जेदार घरे मिळावीत, त्यांना वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा मोफत मिळाव्यात, हा आमचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या सर्व घरांवर सौरऊर्जा प्रणाली बसविण्यात येईल आणि त्यामुळे या कुटुंबांना वीजबिलाचा भार सहन करावा लागणार नाही.” मुख्यमंत्री फडणवी...

माळेवाडी (ता. शिराळा) येथे घरात घुसलेला बिबटयाअखेर जेरबंद.

Image
माळेवाडी (ता. शिराळा) येथे घरात घुसलेला बिबटयाअखेर जेरबंद. ---------------------------------- बच्चे सावर्डे प्रतिनिधी   सुनिल पाटील  ---------------------------------- कोकरुड :  कोकरुड पैकी माळेवाडी ता.शिराळा येथील अश्विनी अरुण गोसावी या महिलेने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला कोंडून घातल्यामुळे त्यास जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले.      याबाबत कोकरूड पोलिस, वन विभाग व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, माळेवाडी येथील असलेल्या गोसावी वस्तीत बाळू आनंदा गोसावी यांचे दुमजली घर असून, खाली ते त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. तर वरच्या मजल्यावर असलेली खोली अडगळीचे सामान व इतर साहित्य,कपडे सुकविण्यासाठी वापरतात. या खोलीचा दरवाजा रात्रभर उघडा असल्याने रविवारी शेजारी असलेल्या शौचालयाचा सहारा घेत रात्रीच्या वेळी बिबट्याने दरवाजा मधून आत मध्ये घुसून खोलीत असलेल्या कॉटखाली बसला होता. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बाळू गोसावी यांची सून अश्विनी गोसावी या वाळवण्यासाठी टाकलेली कपडे आणावयास गेल्या असता त्यांना कॉटखाली काहीतरी बसलेले दिसले. प्रथम दर्शनी त्यांना कु...

वारणा नदीच्या पुरामुळे सावर्डे–मांगले बंधारा तिसऱ्यादा पाण्याखाली.

Image
  वारणा नदीच्या पुरामुळे सावर्डे–मांगले बंधारा  तिसऱ्यादा पाण्याखाली. --------------------------------- बच्चे सावर्डे  प्रतिनिधी   सुनिल पाटील  --------------------------------- सावर्डे परिसरात पावसाने जोर धरले असून वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, सावर्डे–मांगले येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. या बंधाऱ्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.  गेली चार पाच दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे छोटे-मोठे ओढे, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. त्याचा परिणाम म्हणून वारणा नदी पात्राबाहेर गेली आहे. नदीकाठची शेती, पिके व मळे पाण्याखाली गेले असून नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बंधाऱ्यावर किंवा नदीपात्राजवळ जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित स्थळी हलवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे .

श्री महाकाल प्रतिष्ठान, बच्चे सावर्डे आयोजित कावड यात्रा २०२५ संपन्न.

Image
  श्री महाकाल प्रतिष्ठान, बच्चे सावर्डे आयोजित कावड यात्रा २०२५ संपन्न. ---------------------------------- बच्चे सावर्डे प्रतिनिधी  ----------------------------------- श्री महाकाल प्रतिष्ठान, बच्चे सावर्डे तर्फे कावड यात्रा २०२५ रविवार दि. १७ ऑगस्ट व सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडली. ही  कावड यात्रा बच्चे सावर्डे  येथील महादेव  मंदिर येथून प्रारंभ होऊन श्री क्षेत्र मल्लिकार्जुन, येडेनिपाणी येथे समाप्त झाली. यात्रे मध्ये सुमारे २८ किलोमीटर अंतर पार केले. या यात्रे मध्ये 20 ते 25 तरुणांचा सहभाग होता. यात्रेदरम्यान मांगले येथे शिवप्रतिष्ठान तर्फे यात्रेचे स्वागत करण्यात आले. ऐतवडे येथे अतुल पाटील (मोरया बाजार, माले) यांचेकडून यात्रेकरूंना जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेचा समारोप श्री मल्लिकार्जुन मंदिर, येडेनिपाणी येथे करण्यात आला.

सरपिराजीराव तलावाच्या सांडव्यावर पूलासंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांची भेट.

Image
  सरपिराजीराव तलावाच्या सांडव्यावर  पूलासंदर्भात  शासकीय अधिकाऱ्यांची भेट. ---------------------------------- मुरगूड प्रतिनिधी  जोतीराम कुंभार ---------------------------------- मुरगुड येथील सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावरती पूल व्हावा अशी नागरिकांनी मागणी केली होती. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी चढते आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात मिश्रण झाल्यामुळे अनेकांचे अपघात होत आहेत तसेच पावसाळ्यात हा एकमेव मार्ग तरी सुरू असावा यासाठी हा पूल होणे गरजेचे आहे या मागणीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली कागलचे आमदार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन असो मुश्रीफ यांनी देखील याचा पाठपुरावा केल्यामुळे आज शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणीसाठी मुरगुड शहरात भेट दिली यावेळी त्यांनी नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या तसेच लवकरात लवकर पुल होण्यासाठी यासंदर्भात त्यांनी पाहणी करून अहवाल जिल्हाधिकारी सादर करू असे उपस्थितांना सांगितले सांगितले त्यांना सांगितले मुरगुड मधील शिवभक्त यांच्यावतीने दरवर्षी येथील शेवाळ काढले जाते या पूल होण्यासंदर्भातील मागणीसाठी शि...

शहापूर पोलीस ठाण्याची कारवाई, चार तासात कुणाचा छडा उघड.

Image
  शहापूर पोलीस ठाण्याची कारवाई, चार तासात कुणाचा छडा उघड. ---------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी  सलीम शेख  ---------------------------- इचलकरंजी : कौटुंबिक वादातून एका मित्राचा खून केल्याप्रकरणी शाहपूर पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अवघ्या चार तासांत अटक केली आहे. आरोपींना न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शाहपूर पोलीस ठाण्याची कारवाई करत १६ ऑगस्ट रोजी रात्री १०.१८ च्या सुमारास शाहपूरमधील गणेशनगर येथे ही घटना घडली होती. आरोपी संतोष दशरथ पागे (वय ३८) आणि संजय दशरथ पागे (वय ३६), दोघेही रा. गणेशनगर, शाहपूर.यांनी विनोद आण्णासो घुगरे (वय ३२), रा. गणेशनगर, शाहपूर यांचा दगडी वरवंट्याने ठेचून जबर जखमी केले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाहपूर येथील गणेशनगरमध्ये राहणारे संतोष पागे, संजय पागे आणि विनोद घुगरे हे तिघे मित्र होते. विनोद घुगरे याचे संतोष पागे यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय संतोषला होता. याच कारणावरून संतोष आणि त्याचा भाऊ संजय यांनी १६ ऑगस्टच्या रात्री विनोदसोबत वाद घातला. या वाद विकोपाला जाऊ...

शिरोळ–कुरुंदवाड बार-परमिटवर खाजगी कर्मचाऱ्यांद्वारे ‘कलेक्शन’ — निरीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.

Image
  शिरोळ–कुरुंदवाड बार-परमिटवर खाजगी कर्मचाऱ्यांद्वारे ‘कलेक्शन’ — निरीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.  -------------------------------- जयसिंगपूर, प्रतिनिधी नामदेव भोसले -------------------------------- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इचलकरंजी दुय्यम निरीक्षक कार्यालयांतर्गत शिरोळ व कुरुंदवाड विभागातील परवानाधारक बार व परमिट रूमवर दरमहा ‘कलेक्शन’ घेतल्याचा आरोप समोर आला आहे. ही वसुली थेट अधिकाऱ्यांकडून न होता खाजगी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत असल्याचे स्थानिक सूत्रांकडून समजते. यामुळे उत्पादन शुल्क निरीक्षकांचा यात नेमका किती सहभाग आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही बार व परमिट धारकांवर तपास, दंड किंवा कारवाई टाळण्यासाठी ठराविक रक्कम गोळा केली जाते. ही रक्कम संबंधित खाजगी कर्मचारी गोळा करतात व त्यामागे ‘अधिकाऱ्यांची संमती’ असल्याची चर्चा सुरू आहे. 📌 चौकट... शासन कार्यालयातील महसूल व तपासाशी संबंधित कामात खाजगी व्यक्तींचा हस्तक्षेप बेकायदेशीर आहे. अशा प्रकारचे ‘कलेक्शन’ प्रतिबंधक भ्रष्टाचार कायदा, 1988 अंतर्गत गुन्हा ठरू शकतो. चौकट... स्थान...

जयसिंगपुरात डॉ. बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य भिमसृष्टी लवकरच साकारणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर.

Image
  जयसिंगपुरात डॉ. बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य भिमसृष्टी लवकरच साकारणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर. ------------------------------- जयसिंगपूर प्रतिनिधी ------------------------------- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पांचा त्यांच्या लौकिकास साजेसा असा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी भव्य भीमसारी जयसिंगपूर शहरात लवकरच साकारत असून जयसिंगपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून उभे राहणारे डॉ. बाबासाहेबांचे हे भव्य स्मारक नव्या पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे ठरेल अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी श्रीमती टीना गवळी योनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दिली. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना शिरोळ तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे जयसिंगपूर शहरामध्ये उभारणार अशी ग्वाही मी शिरोळच्या जनतेला दिली होती असे सांगताना यड्रावकर म्हणाले सध्या उभारण्यात आलेल्या शिवतीर्थाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तर डॉ. ब...

हातकणंगले पोलिसांची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई, सात जणांविरोधात गुन्हा दाखल.

Image
  हातकणंगले पोलिसांची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई, सात जणांविरोधात गुन्हा दाखल. --------------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी संस्कार कुंभार  --------------------------------- हातकणंगले : हातकणंगले पोलिसांनी अतिग्रे येथील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईत ३,५३,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि सात मोटारसायकलींचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा अतिग्रे गावाच्या हद्दीत संजय आनंदा काकडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तातडीने छापा टाकला. त्यावेळी काही लोक पैशांची बाजी लावून 'तीन पानी' पत्त्यांचा खेळ खेळताना आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून संजय आनंदा काकडे (वय ३०), रामदास कृष्णा पाटील (वय ७६), रविंद्र भोपाल चोकाककर (वय ५३), शिवाजी माणिक दबडे (वय ४२), अशोक दत्तु चौगुले (वय ६०), किशोर बंडु बोरगावे (वय ४३) आणि कबीर सदाशिव सामंत (वय ४५) या सात जणांना ताब्या...

कोल्हापुरात सर्किट बेंचचे ऐतिहासिक उद्घाटन: न्यायाच्या नव्या पर्वाची सुरुवात.

Image
  कोल्हापुरात सर्किट बेंचचे ऐतिहासिक उद्घाटन: न्यायाच्या नव्या पर्वाची सुरुवात. ------------------------------ शशिकांत कुंभार  ------------------------------ कोल्हापूर :  न्यायाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत कोल्हापुरात सर्किट बेंचचे दिमाखदार उद्घाटन पार पडले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्यात त्यांनी रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित न्यायव्यवस्था कोल्हापुरात न्यायदानाचे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला. या सर्किट बेंचसाठी गेल्या चार दशकांपासून विविध सामाजिक संघटना, वकील संघटना, पक्षकार आणि आजी-माजी लोकप्रतिनिधींनी सातत्याने लढा दिला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि कोल्हापूर न्यायाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित झाले. उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. य...

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील खड्यात आंघोळ करून निषेध.

Image
  कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील खड्यात आंघोळ करून निषेध. ------------------------------ कळे प्रतिनिधी साईश मोळे ------------------------------ कळे:- कोल्हापूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर लक्ष वेधण्यासाठी  (देव देश धर्म रक्षक संघटना) छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन तर्फे सामाजिक कार्यकर्ता अक्षय बेलेकर यांनी जगावेगळा निषेध व्यक्त केला. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर किरवे येथे रस्त्यातील खड्ड्यात साचलेल्या चिखलात बसून त्यांनी थेट अंघोळ करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.         गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यांची दुर्दशा कायम असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांत साचून वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. दररोज अपघात होण्याची शक्यता असूनही संबधित विभाग मात्र दुर्लक्ष करत आहे. त्वरित रस्त्यांतील खड्डे मुजवून जनतेला दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली. कोल्हापूर विभाग

मुंबई -पुण्यासह सहा जिल्ह्यात रेड अलर्ट- राज्यात पूरपरिस्थितीचा धोका निर्माण होणार का ?

Image
  मुंबई -पुण्यासह सहा जिल्ह्यात रेड अलर्ट- राज्यात  पूरपरिस्थितीचा धोका निर्माण होणार का ? --------------------------------  मिरज तालुका प्रतिनिधी  राजू कदम -------------------------------- राजधानी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. तीन दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसाने सोमवारीही जोर कायम ठेवला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील तीन ते चार तासांत ‘अति मुसळधार पावसाचा’ अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वाहतूक ठप्प, रस्त्यावर पाणीच पाणी रविवार आणि सोमवारी पडलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. दादर, सायन, कुर्ला, अंधेरी, मिलन सबवे, धारावी, भांडुप आदी भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. परिणामी रस्त्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून लोकल ट्रेन सेवा उशिराने धावत आहेत. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. रविवारी पावसाचा आकडा रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत मुंबईत सरासरी २३.८१ मिमी पाऊस नोंदवला गेला. ...

विद्यामंदिर कोनोली तर्फ असंडोली शाळेला साऊंड सिस्टिम प्रदान.

Image
  विद्यामंदिर कोनोली तर्फ असंडोली  शाळेला साऊंड सिस्टिम प्रदान. ------------------------------ पन्हाळा प्रतिनिधी  आशिष पाटील ------------------------------ विद्यामंदिर कोनोली तर्फ असंडोली शाळेत 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांनी शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून शाळेला छत्तीस हजार पाचशे रुपये किमतीची साऊंड सिस्टिम प्रदान केली. शाळेतील भौतिक सुविधा  पुर्ततेसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मीटिंगमध्ये शाळेच्या वतीने सर्वांना आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी गावातील सर्व ग्रामस्थांना शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून शाळेसाठी साउंड सिस्टिम उपलब्ध करून देणे विषयी आवाहन केले. ग्रामस्थांनी देखील या आवाहनास प्रतिसाद देत जवळजवळ 36 हजार पाचशे रुपये किमतीची साऊंड सिस्टीम स्वातंत्र्य दिना विषयी शाळेला प्रदान केली. तसेच भविष्यात शाळेच्या प्रगतीची घोडदौड अशीच चालू राहिल्यास यापुढे देखील भरघोस अशी मदत करून मोठा शैक्षणिक उठाव उभा केला जाईल अशा प्रकारची सर्वांच्या वतीने ग्वाही देण्यात आली. यावेळी शाळेच्या रंग र...

पणुंद्रे चिखलगुट्टा मैदानात करंजपेणच्या उत्तम पाटील यांची बैलजोडी प्रथम.

Image
  पणुंद्रे चिखलगुट्टा मैदानात करंजपेणच्या उत्तम पाटील यांची बैलजोडी प्रथम. ------------------------------- मलकापूर प्रतिनिधी  रोहित पास्ते -------------------------------     पणुंद्रे येथे सतीमाता तरुण मंडळ, जाधववाडी व पणुंद्रे ग्रामपंचायत आणि शर्यतीचे आयोजक रविंद्र जाधव यांनी आयोजित केलेल्या चिखल गुठ्ठा शर्यत स्पर्धेत उत्तम पाटील ( करंजपेण )यांच्या बैलजोडी ने प्रथम क्रमांक पटकावला आणि रेडा जोडी मध्ये प्रथम क्रमांक राजाराम पाटील( जाधववाडी )या चिखलगुठ्ठा बैलजोडी रेडा जोडीना रोख रुपये आणि मानाची ढाल बक्षिस देण्यात आले   या चिखलगुट्टा शर्यतीचे उद्घाटन भाजप नेते व शेतकरी जन आक्रोश आंदोलन प्रमुख आबासाहेब पाटील व सुभेदार सुनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी    या शर्यतीत पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातील १५ बैल व १३ रेडा जोडी अशा २८ जोडीने सहभाग घेतला होता पणुंद्रे गावातील  भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असणारे जवानाने चिखलगुठ्ठा शर्यतीस देणगी देऊन सहभाग घेतला  पहिल्या पाच  क्रमांकांना रोख रक्कम व मानाची ढाल  देऊन गौरव कर...

कौटुंबिक वादातून मित्राची हत्या, शहापूरमध्ये खळबळ.

Image
  कौटुंबिक वादातून मित्राची हत्या, शहापूरमध्ये खळबळ. ---------------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी सलीम शेख  ----------------------------------  शहापूर: पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयातून एका व्यक्तीने आपल्याच मित्राची वरवंट्याने डोक्यात मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना शहापूर येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. शहापूर येथील गणेशनगर, गल्ली नंबर तीन येथे ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद अण्णासो घुगरे (वय ३२, रा. शहापूर) आणि आरोपी संतोष दशरथ पागे ऊर्फ नागणे (वय ३८) हे दोघे मित्र होते. १६ ऑगस्टच्या रात्री १० वाजेनंतर संतोष पागे यांच्या राहत्या घरी त्यांच्यामध्ये वाद झाला. संतोष पागे यांना त्यांचा मित्र विनोद घुगरे यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून संतप्त झालेल्या संतोष पागे यांनी दगडी वरवंट्याने विनोद घुगरे यांच्या डोक्यावर आणि कपाळावर जोरदार प्रहार केले, ज्यात विनोद गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मृताची बहीण वनिता सचिन बोरगे यांन...

दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने दूधगंगा धरणातून 5500 घनफूट प्रतिसेकंद दूधगंगा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू.

Image
 दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने दूधगंगा धरणातून 5500 घनफूट प्रतिसेकंद दूधगंगा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. ------------------------------------ राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------------ दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढ होत असल्याने दूधगंगा काळमवाडी धरणातून 5500 घनफूट प्रतिसेकंद आज सोमवारी सकाळी सोडण्यात आली असल्याची माहिती दूधगंगा धरण व्यवस्थापन शाखेचे शाखा अधिकारी प्राजक्ता कळमकर यांनी दिली. दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये वाढ होत असल्याने दूधगंगा धरण व्यवस्थापनाने तातडीने 4000 घनफूट प्रति सेकंद पाणी सोडण्याचा व विद्युत निर्मितीतून 1500 घनफूट प्रतिसेकंद असा 5500 घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग दूधगंगा धरणातून आज सोमवारी सकाळी 10:30 वाजता सोडण्यात आले असून दूधगंगा नदी काठावरील सर्व गावकरी ग्रामस्थ व शेतकरी यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे असे आव्हान दूधगंगा धर...

विजेचा शॉक बसून राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडीच्या जवानांचा मृत्यू .

Image
 विजेचा शॉक बसून राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडीच्या जवानांचा मृत्यू . *********************** राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे. *********************** राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी येथील जवान सातापा गोविंद मिसाळ हा इंडियन आर्मी मध्ये असून पंजाबमधील सरकारी कॉटर मध्ये राहत होता त्या ठिकाणी वाशिंग मशीन चे काम करत असताना त्या ठिकाणी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला असल्याचे समजते त्यामध्ये जवान सातापा मिसाळ यांची पत्नीला पण शॉक लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्यास समजते साताप्पा मिसाळ या जवानाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने मिसाळवाडीसह राधानगरी परिसरात शोककळा पसरली आहे

राधानगरी पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस. राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे ओपन .

Image
  राधानगरी पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस. राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे ओपन . ------------------------------------- राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------------- राधानगरी पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणाचे  सात स्वयंचलित आज सोमवारी पहाटे 3:54 ते चार वाजून वीस मिनिटांनी उघडले असल्याची माहिती राधानगरी जलसंपदा  विभागाचे शाखा अभियंता समीर निरूखे यांनी राष्ट्रीय युटुब व पोर्टल चॅनेल फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र चे प्रतिनिधी विजय बकरे यांच्या शी बोलताना दिली.  राधानगरी पश्चिम भागामध्ये गेले चार दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपून काढले असल्याने राधानगरी धरणाचे सात स्वंचलित दरवाजे आज सोमवारी पहाटे तीन वाजून 54 मिनिटांनी ते चार वाजून वीस मिनिटापर्यंत सात स्वयंचलित दरवाजे ओपन झाले असून धरण परिसरात आज सकाळी सहा पर्यंत 125  मिलिमीटर पाऊस पडला असून सात स्वंचालित दरवाज्यातून 8568 क्यूसेक पाण्याची विसर्ग होत आहे तर बी ओ टी मधून 1500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून असा एकूण 100 68 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये ...

पेठवडगाव येथे आमदार चषक महायुती मानाच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन.

Image
  पेठवडगाव येथे आमदार चषक महायुती मानाच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन. -------------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी किशोर जासूद. -------------------------------- पेठवडगाव : पेठवडगाव येथे १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आमदार चषक महायुती मानाची दहीहंडी उत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने बापू प्रेमी यांच्यावतीने प्रतिवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त पेठवडगाव येथे महायुती मानाची दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. काही वर्षातच आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने बापू यांचा हातकणंगले विधानसभा मतदार संघातील लोकप्रियतेमध्ये वाढ होवून विधानसभा निवडणूकीमध्ये अभूतपूर्व असे यश मिळाले. आमदार माने यांनी आपल्या लोकसंपर्कातून मतदार संघातील जनतेमध्ये आपली वेगळी अशी प्रतिमा तयार केली आहे. सामान्य माणसांचे बापू आणि युवकांचे आयडॉल बापू अशी आपली छाप लोकमनावर पाडण्यात ते यशस्वी झाले. नेहमी त्यांनी गणेशचतुर्थी, दहीहंडी सारख्या सार्वजनिक उत्सवांना प्रोत्साहन दिले. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने...

गावच्या विकासासाठी कायम कटिबद्ध : विरेंद्र शिंदे.

Image
  गावच्या विकासासाठी कायम कटिबद्ध : विरेंद्र शिंदे. ---------------------------- जावळी  प्रतिनिधी शेखर जाधव ---------------------------- वारागडे आळीच्या काँक्रिटीकरण रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मंत्री ना.बाबाराजेंचे जाहीर आभार: राहुल ननावरे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी‌ आमदार स्थानिक विकास निधी मधून वारागडे आळी‌ कुडाळ येथे रस्ता काँक्रिटीकरणासाठी तब्बल  *10,00,000/-(दहा लाख)* रु.चा निधी मंजूर करून दिला‌ होता.या रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ व भूमिपूजन सोहळ्याचे आज कुडाळ येथे सातारा जिल्हा दिशा समिती सदस्य विरेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.यावेळी  विरेंद्र शिंदे बोलताना म्हणाले नेताजी वार्ड मधील वारागडे आळी येथील रस्ता मंजूर होण्यासाठी युवा नेते व ग्रामपंचायत सदस्य राहुल ननावरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छ.शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता.या त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून हा रस्ता कॉंक्रिटीकरणच करण्यात यावा यावर म...

हातकणंगले येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरी, ५.९२ लाखांचा ऐवज लंपास.

Image
  हातकणंगले येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरी, ५.९२ लाखांचा ऐवज लंपास. --------------------------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी संस्कार कुंभार  --------------------------------------------- हातकणंगले : हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील मगदूम मळा येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ९२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाईल फोन असा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. शीतल राजाराम मगदूम (वय ४८, रा. मगदूम मळा, तारदाळ) यांच्या घरी ही घटना घडली. १६ रोजी पहाटेच्या वेळेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला असावा अंदाज आहे. कशाच्यातरी मदतीने घरातील तिजोरीचे लॉक तोडून चोरट्याने १.५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या चोरीमध्ये सोन्याच्या पाटल्या, अंगठ्या, कानातील झुब्याची फुले आणि सोन्याची चेन यांचा समावेश आहे. याचवेळी, फिर्यादीच्या पुतण्या, प्रवीण मगदूम यांच्या घरातही चोरी झाली. चोरट्यांनी त्यांच्या घरातून १.५० लाख रुपयांचे सोन्याचे गंठन, ५० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, २५...

कागलमध्ये 'आम्ही भारतीय लोक' यांच्या वतीने निषेध फेरी: निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.

Image
  कागलमध्ये 'आम्ही भारतीय लोक' यांच्या वतीने निषेध फेरी: निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. ---------------------------------------  कोल्हापूर प्रतिनिधी सलीम शेख  ---------------------------------------  कागल : निवडणूक आयोग आणि सत्ताधारी यांच्या संगनमताने होणाऱ्या 'मतचोरी' विरोधात आज 'आम्ही भारतीय लोक' या संघटनेच्या वतीने कागल येथे मतदार जागृती रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू, क्रांतिसिंह नाना पाटील, भगतसिंग, राजगुरू, आणि सुखदेव यांच्यासारख्या देशभक्तांचे फोटो हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था असूनही, निवडणुका खुल्या आणि निष्पक्ष वातावरणात घेण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. केवळ ईव्हीएमच नाही, तर इतर अनेक मार्गांनीही मतांची चोरी होत असून, नागरि,,,,,,,,,, मताधिकार हिरावून घेणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. याच गंभीर परिस्थितीचा निषेध करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. ही निषेध फेरी कागलमधील शिवाजी महार...

कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन: ४२ वर्षांच्या संघर्षाला यश.

Image
  कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन: ४२ वर्षांच्या संघर्षाला यश. --------------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी शशिकांत कुंभार  --------------------------------- कोल्हापूर : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील जनतेचा गेल्या ४२ वर्षांपासूनचा संघर्ष आणि प्रतीक्षेची अखेर आज यशस्वी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या हस्ते आज मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन कोल्हापुरात झाले. हा क्षण कोल्हापूरकरांच्या न्याय्य लढ्याचा एक मोठा विजय असून, या उद्घाटन सोहळ्याने न्यायदानाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, खासदार शाहू छत्रपती महाराज, जिल्ह्यातील खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारीही या सोहळ्यात सहभागी झाले होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापू...

राधानगरी पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज रविवारी उघडले.

Image
  राधानगरी पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज रविवारी उघडले. ------------------------------- राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------- राधानगरी पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित आज रविवारी दुपारनंतर उघडले असल्याची माहिती राधानगरी जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता समीर निरूखे यांनी दैनिक सुपर भारत प्रतिनिधी विजय बकरे यांना दिली  राधानगरी पश्चिम भागामध्ये गेली तीन दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपून काढले असल्याने राधानगरी धरणाचे चार स्वंचलित दरवाजे आज रविवारी दुपारी दोन वाजून 19 मिनिटाने ते सायंकाळी पाच पासून 18 मिनिटाने असे दरवाजे उघडल्या असून धरण परिसरात सायंकाळी चार वाजेपर्यंत 25 मिलिमीटर पाऊस पडला असून चार स्वंचालित दरवाज्यातून 5712 क्यूसेक पाण्याची विसर्ग होत आहे तर बी ओ टी मधून 1500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून असा एकूण 7212 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे तरी भोगावती नदी काठाच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान राधानगरी जनसंपदा विभाग...

जयसिंगपूरमध्ये रुग्णांची लूट – फक्त ८ टाके घालण्यासाठी तब्बल २३,५०० रुपयांचे बिल.

Image
  जयसिंगपूरमध्ये रुग्णांची लूट – फक्त ८ टाके घालण्यासाठी तब्बल २३,५०० रुपयांचे बिल. ------------------------------------ जयसिंगपूर प्रतिनिधी  नामदेव भोसले  ------------------------------------ जयसिंगपूरमध्ये रुग्णांची लूट – फक्त ८ टाके घालण्यासाठी तब्बल २३,५०० रुपयांचे बिल. जयसिंगपूर : सर्वसामान्य रुग्णांची वैद्यकीय क्षेत्रातून होत असलेली सर्रास लूट अजूनही थांबलेली नाही. नुकतीच जयसिंगपूर शहरातील पायोस हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एका रुग्णावर केवळ ८ टाके घालण्यात आले. परंतु, रुग्णालय प्रशासनाने बारा तासांच्या आत तब्बल ₹२३,५०० चे बिल वसूल केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट जिल्हाध्यक्ष गड किल्ले संवर्धन प्रमुख राहुल मोरे यांनी हा प्रकार उघड करत संताप व्यक्त केला. “फक्त टाके घालण्यासाठी एवढा खर्च होतो का? मनमानी बिल लावून सर्वसामान्यांची लूट केली जाते. सेवा भावना संपुष्टात येऊन रुग्णालये केवळ कमाईचे साधन बनली आहेत. या विषयावर सरकारने लक्ष घालून लूट थांबवावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे. स्थानिक लोकांचा सवाल असा की, “८ टाक्यांसाठी २३,५०० रुपये? – ही सेवा की लूट?” या संदर्...

हौसेला मोल नाही! वेतवडेत पाटील कुटूंबियाच्या घरी गाईची ओटी भरणी कार्यक्रम.

Image
  हौसेला मोल नाही! वेतवडेत पाटील कुटूंबियाच्या घरी गाईची ओटी भरणी कार्यक्रम. कुणी तरी येणार येणार गं’ म्हणत डोहाळे जेवण भरवले जात असते. पण जर हेच डोहाळे जेवण एखाद्या गायीचे असेल तर..! पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील एका कुटुंबाने आपल्या लाडाच्या देशी गायीचे मोठ्या थाटामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला. त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. कुणावर किती प्रेम असेल, तसे सांगणे अवघड आहे. कारण पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील एका गाय प्रेमीने आपल्या गाईचे चक्क डोहाळे जेवण घातले. हे डोहाळे जेवण काही साधं-सुधा नव्हतं. तर अगदी झकास होते. गाईला सजवण्यापासून मेजवानीसाठी पंचपक्वान्नांची सोय ,आहेर-माहेर असे सर्व काही करण्यात आले. हा सोहळा अगदी एखाद्या सुवासिनीच्या ओटीभरणीपेक्षाही दिमाखदार होता. धामणी खोऱ्यातील वेतवडे ता पन्हाळा गावचे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी शिवाजी राणोजी पाटील यांची देशी गोमाता पहिल्यांदा गाबन राहिली तिचा सातवा महिना असल्याने पाटील कुटुंबातील सर्वांनी ठरवले की आपण गोमातेचे ओटी भरणे (डोहाळे जेवन) घालू आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी गावांतील सुहासिनी महिलांना बोलावून ओठी भरण्याचा कार्...

भैरवनाथसहकारी दूध संस्थेच्या चेअरमनपदी बाबुराव पाटील व व्हा चेअरमन पदी अर्चना माने बिनविरोध.

Image
  भैरवनाथसहकारी दूध संस्थेच्या चेअरमनपदी बाबुराव पाटील व व्हा चेअरमन पदी अर्चना माने बिनविरोध. --------------------------- जेऊर ता. पन्हाळा ---------------------------  येथील भैरवनाथ सहकारी दूध संस्थेच्या चेअरमनपदी बाबुराव सदाशिव पाटील तर व्हा. चेअरमनपदी अर्चना विश्वास माने यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या कार्यालयात नूतन संचालक मंडळाची बैठक पार पडली.   संस्थेच्या संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक बिनविरोध पार पडली त्यामध्ये बाबुराव सदाशिव पाटील अमर रामचंद्र पाटील विलास रामचंद्र पोवार संदीप बाळासो खांडेकर महादेव तुकाराम गोसावी बाबासाहेब यशवंत पाटील मंगल शामराव पाटील आक्काताई प्रकाश खांडेकर आशा सुरेश डावरे अर्चना विश्वास माने यांची संचालक पदी निवड झाली आज नूतन संचालक मंडळाची बैठक होऊन सर्वानुमते चेअरमनपदी बाबुराव सदाशिव पाटील तर व्हा. चेअरमन पदी अर्चना विश्वास माने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी एस हंचनाळे यांनी काम पाहिले यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा लेखापरीक्षक भगवान पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वागत सचिव भीमराव पाटील य...

उचंगावमधील सदगुरु कॉम्प्लेक्समध्ये घरफोडी: गणपतीचे साडेतीन किलो चांदीचे दागिने लंपास.

Image
  उचंगावमधील सदगुरु कॉम्प्लेक्समध्ये घरफोडी: गणपतीचे साडेतीन किलो चांदीचे दागिने लंपास. ------------------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी ------------------------------------- : गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उंचगाव  मध्ये असणाऱ्या सदगुरू कॉम्प्लेक्समध्ये भरवस्तीत अज्ञात चोरट्यांनी दोन बंद असलेल्या घरामध्ये घरफोडी करून अंदाजे साडेतीन किलो वजनाचे चांदीचे दागिने लंपास केले आहेत.  चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे दीड लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना भर वस्तीत घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.चोरांनी बंद घरे हेरुन चोरी करण्याचे सत्र सुरू केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सदगुरु कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या शांता सुभाष पठाडे यांच्या घरात ही चोरी झाली. पठाडे या मूळच्या  उंचगावच्या रहिवासी असून, त्या आपल्या मुलीकडे कोल्हापूर मध्ये असणाऱ्या आयडियल कॉलनीमध्ये राहतात.  त्या सदगुरु कॉम्प्लेक्स मधील त्यांच्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या भाडे करू फोन करून सांगितले.. चोरीचा प्रकार सकाळी उघडकीस आला. भाडेकरू पाणी भरण्यासाठी आले असता, त्या...

शिरोळ–कुरुंदवाड बार-परमिटवर खाजगी कर्मचाऱ्यांद्वारे ‘कलेक्शन’ — निरीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह..

Image
  शिरोळ–कुरुंदवाड बार-परमिटवर खाजगी कर्मचाऱ्यांद्वारे ‘कलेक्शन’ — निरीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह..  ---------------------------------- जयसिंगपूर, प्रतिनिधी नामदेव भोसले ----------------------------------- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इचलकरंजी दुय्यम निरीक्षक कार्यालयांतर्गत शिरोळ व कुरुंदवाड विभागातील परवानाधारक बार व परमिट रूमवर दरमहा ‘कलेक्शन’ घेतल्याचा आरोप समोर आला आहे. ही वसुली थेट अधिकाऱ्यांकडून न होता खाजगी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत असल्याचे स्थानिक सूत्रांकडून समजते. यामुळे उत्पादन शुल्क निरीक्षकांचा यात नेमका किती सहभाग आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही बार व परमिट धारकांवर तपास, दंड किंवा कारवाई टाळण्यासाठी ठराविक रक्कम गोळा केली जाते. ही रक्कम संबंधित खाजगी कर्मचारी गोळा करतात व त्यामागे ‘अधिकाऱ्यांची संमती’ असल्याची चर्चा सुरू आहे. 📌 चौकट... शासन कार्यालयातील महसूल व तपासाशी संबंधित कामात खाजगी व्यक्तींचा हस्तक्षेप बेकायदेशीर आहे. अशा प्रकारचे ‘कलेक्शन’ प्रतिबंधक भ्रष्टाचार कायदा, 1988 अंतर्गत गुन्हा ठरू शकतो. चौकट......

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे राजभवनात भरत पाटील यांच्या हस्ते स्वागत; कोल्हापूरच्या औद्योगिक विकासावर चर्चा.

Image
  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे राजभवनात भरत पाटील यांच्या हस्ते स्वागत; कोल्हापूरच्या औद्योगिक विकासावर चर्चा. ---------------------------------------  कोल्हापूर प्रतिनिधी  सलीम शेख  ---------------------------------------  कोल्हापूर : १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा 'भाजपा स्टार्टअप इंडिया'चे जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी भरत पाटील यांनी राज्यपालांना शाल, श्रीफळ आणि महाराणी ताराराणी यांचा पुतळा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. या भेटीदरम्यान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि भरत पाटील यांच्यात कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पाटील यांनी जिल्ह्यातील उद्योगांसमोरील आव्हाने आणि त्यांच्या निराकरणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्यपालांना माहिती दिली. या चर्चेदरम्यान, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती पावल...

कोरोची येथे वादातून युवकावर कटरने हल्ला, एक गंभीर जखमी.

Image
  कोरोची येथे वादातून युवकावर कटरने हल्ला, एक गंभीर जखमी. ------------------------------ कोल्हापूर प्रतिनिधी संस्कार कुंभार  ------------------------------ कोरोची: येथील विवेकानंदनगर परिसरात एका किरकोळ वादातून एका युवकावर कटरने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात अथर्व जितेंद्र चव्हाण (वय २६) हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता अंकिता टेक्सटाईल्स, चिंतामणी गणेश मंदिरासमोर, विवेकानंदनगर, कोरोची येथे ही घटना घडली. प्रसाद विजय चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा चुलत भाऊ अथर्व चव्हाण याने कामगार सुमित याला काही काम सांगितले. याचा राग मनात धरून सुमितचा मित्र सचिन उमाशंकर कुमार (वय ३४) याने अथर्वशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादातून सचिन कुमार याने आपल्या हातातील रेडिअम कटरने अथर्व चव्हाण यांच्या उजव्या हातावर आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात अथर्व गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थ...

किणी येथे एका युवतीची आत्महत्या.

Image
  किणी येथे एका युवतीची आत्महत्या. ---------------------------------------  कोल्हापूर प्रतिनिधी सलीम शेख  ---------------------------------------  कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील किणी येथील १७ वर्षीय महाविद्यालयीन युवतीने एका अल्पवयीन मुलाच्या एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आयेशा जमीर महाबरी असे या दुर्दैवी युवतीचे नाव आहे. पोलीस बनून कुटुंबाची गरिबी दूर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आयेशाने बुधवारी (१३ ऑगस्ट) सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले. ही आत्महत्या नसून खूनच आहे, असा आरोप करत संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी संबंधित अल्पवयीन मुलाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलीस होण्याचं होतं स्वप्न किणी गावात राहणारे जमीर महाबरी हे ट्रॅक्टर चालक आहेत, तर त्यांची पत्नी मजुरीचे काम करते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्यांची १७ वर्षांची मुलगी आयेशा शिक्षण घेत होती. ती पोलीस भरती होऊन कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं स्वप्न पाहत होती. रोज महाविद्यालयात ये-जा करताना गावातीलच एक ...

कुंभोजमधील गावकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. गावठाण घरकुल लाभार्थ्यांना मिळणार घरकुल लाभ.

Image
  कुंभोजमधील गावकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. गावठाण घरकुल लाभार्थ्यांना मिळणार घरकुल लाभ. ---------------------------  कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ---------------------------       कुंभोज गावठाणमधील लाभार्थ्यांचे असेसमेंट उताऱ्यावर महाराष्ट्र सरकार नाव लागते त्यामुळे त्यांना कित्येक वर्षे घरकुल लाभ घेता येत न्हवता.. म्हणून मी माझ्या सहकारी मित्रांसोबत मंगळवारी ग्रामविकास अधिकारी यांच्यासोबत लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी केली त्यावेळी गावातील प्रमुख नेते तथा जवाहरचे व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले साहेब यांनी त्वरित गेल्या बुधवारी प्रांत दिपक शिंदे यांचे सोबत बैठक लावली होती तेव्हा प्रांताना निवेदन दिले..         सदर बैठकीत गावठाण जागेतील लाभार्थ्यांनी अर्ज करावे असे प्रांत साहेबांनी शिष्टमंडळास सांगितले.. त्यामुळे घरकुल मिळणेबाबत कुठेही धावपळ न करता ग्रामस्थांनी कुंभोज ग्रामपंचायत येथे अर्ज करून लाभ घ्यावा...      तसेच मी गावठाण प्लॉटचे सातबारा होणेबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना सांगून जिल्...

जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले,वडगांव गुन्हेगारी व अवैध धंद्याचा फैलाव — पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासमोर मोठे आव्हान.

Image
  जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले,वडगांव  गुन्हेगारी व अवैध धंद्याचा फैलाव — पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासमोर मोठे आव्हान. ---------------------------- जयसिंगपूर प्रतिनिधी नामदेव भोसले ---------------------------- हातकणंगले, शिरोळ, वडगाव आणि जयसिंगपूर परिसरात गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. खुलेआम सुरू असलेले मटका-जुगार, दारू, गुटका, गांजा विक्री, मोबाईल चोरी, खाजगी सावकारी व तगादा, तसेच कॉलेज परिसरातील दहशत यामुळे कायदा-सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. औद्योगिक विकासासोबतच वर्चस्ववादाच्या संघर्षात धमक्या, दमदाटी आणि हिंसक घटना वाढत आहेत. कारखानदारांकडून कामगार पुरवठ्याच्या ठेक्यासाठी होणारी रस्सीखेच अनेकदा गुन्हेगारीत रूपांतरित होत असून, अल्पवयीन तरुणांचा यात सहभाग चिंताजनक आहे. अवैध धंद्यांतून मिळणारा सहज पैसा आणि पोलिसांची प्रभावी कारवाई नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. यामुळे परिसरातील युवक नशेच्या आहारी जात असून, गंभीर गुन्ह्यांत ओढले जात आहेत. परप्रांतीयांमधील वर्चस्ववादामुळे होणाऱ्या झटापटी, चोरी, वाटमारी यांची नित...

कोल्हापूरमध्ये रिव्हॉल्वरसह तिघांना अटक, ₹१.२० लाखांचा मुद्देमाल जप्त.

Image
कोल्हापूरमध्ये रिव्हॉल्वरसह तिघांना अटक, ₹१.२० लाखांचा मुद्देमाल जप्त. ------------------------------------ कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  ------------------------------------ कोल्हापूर: आगामी गणेशोत्सव आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत विनापरवाना रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ₹१ लाख २० हजार ५५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सददाम गुंडवाडे, प्रथमेश पाटील, संजय पाटील यांना अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार, LCB चे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे विक्रमनगर परिसरातून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडून भारतीय बनावटीचे रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले. या प्रकरणात अधिक तपास केला असता, आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचे समोर आले....

निवृत्त साहाय्यक पोलीस फौजदाराच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.

Image
  निवृत्त साहाय्यक पोलीस फौजदाराच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. -------------------------------- ज्योती अरुण कुंभार. -------------------------------- आज देशामधे ठिकठिकाणी ७९ वा स्वतंत्रा दिन उत्सहात साजरा होत असताना पेरले ता कराड जि सातारा गावचे सुपुत्र सेवानिवृत सहा पोलीस फौजदार चंद्रकांत शं कुंभार यांनी पोलीस दलात ३६ वर्ष देशसेवा केली आहे . त्यांच्या केलेल्या देशसेवेसाठी त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेरले येथे १५ ऑगस्ट दिनी ध्वजवंदन करणेचा मान  मिळाला  त्यावेळी शाळेत मुलांनी राष्ट्रगीता बरोबर कवायती सादर केल्या यावेळी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, सरपंच,  विद्यार्थी , ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात  उपस्थितीत राहून ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला आहे .

गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.

Image
  गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा. --------------------------- गारगोटी प्रतिनिधी  ---------------------------  गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.लोकनियुक्त सरपंच प्रकाश शंकर वास्कर यांच्या हस्ते ग्रामपंचायत आवारात ध्वजारोहण करण्यात आले.  या वेळी उपसरपंच प्रशांत भोई ग्रामपंचायत सदस्य अजित देसाई, सागर शिंदे, पांडुरंग सोरटे, भरत शेटके, राहुल चौगुले,राहुल जाधव, संदीप देसाई, सौ.संध्या कुपटे, सौ.अनिता गुरव, सौ.स्मिता पिसे, सौ.लता चव्हाण. सौ. रूपाली राऊत, सौ. मंजुषा माळी, सौ. पायल पावले,सौ.किरण कल्याणकर,ग्रामविकास अधिकारी विराज गणबावले यांच्यासह आजी माजी सैनिक, विद्यार्थी, ग्रामस्थ, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते